ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ॲडम झाम्पा अलिकडच्या वर्षांत प्रथम श्रेणीमध्ये कमी खेळला आहे. ऑस्ट्रेलियाच्या मर्यादित षटकांच्या फारमॅटमध्ये प्रमुख सदस्य बनलेल्या झाम्पाला विश्वास आहे की, त्याचा सध्याचा फॉर्म आणि अनुभव त्याला कसोटी निवडीसाठी, विशेषत: उपखंडातील दौऱ्यांसाठी प्रबळ दावेदार बनवेल. झाम्पाच्या कसोटी आकांक्षांना गेल्या वर्षी पहिल्यांदा चालना मिळाली जेव्हा तो ऑस्ट्रेलियाच्या भारताच्या कसोटी दौऱ्यासाठी एक मजबूत खेळाडू मानला जात होता. पण, निवडकर्त्यांनी शेवटी क्वीन्सलँडच्या मिचेल स्वेप्सनची निवड केली.
ॲडम झाम्पा (Adam Zampa) फायनल वर्ड पॉडकास्टशी बोलताना म्हणाला की, “मला वाटते की मी ज्या पद्धतीने गोलंदाजी करत आहे, मी ज्याप्रकारचा गोलंदाज आहे, तर मला असे वाटते आहे की, माझ्याकडे कसोटी क्रिकेट खेळण्याची संधी आहे.”
पुढे बोलताना झाम्पा म्हणाला की, “मी भाग्यवान आहे की, विश्वचषक जिंकणाऱ्या संघाचा भाग होतो. पुढे पाहता, फ्रँचायझी गोष्ट माझ्यासाठी नाही. मला जोपर्यंत शक्य आहे तोपर्यंत ऑस्ट्रेलियासाठी खेळायचे आहे. त्या संघातील यशाची भावना मला अधिक हवी आहे. ऑस्ट्रेलियासाठी प्रत्येक सामना खेळणे माझ्या इच्छेवर आधारित आहे, याचा अर्थ मला फ्रँचायझी क्रिकेटबाबत काही निर्णय घ्यावे लागतील.”
ॲडम झाम्पाच्या (Adam Zampa) आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं ऑस्ट्रेलियासाठी 99 एकदिवसीय आणि 87 टी20 सामने खेळले आहेत. त्यानं ऑस्ट्रेलियासाठी अद्याप एकही कसोटी सामना खेळला नाही. 99 एकदिवसीय सामन्यात त्यानं 169 विकेट्स त्याच्या नावावर केल्या आहेत. यादरम्यान त्याचा इकाॅनाॅमी रेट 5.47 राहिला आहे, तर सरासरी 28.05 राहिली आहे. त्याच्या टी20 कारकीर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं 87 टी20 सामन्यात 21.60च्या सरसरीनं 105 विकेट्स घेतल्या. यादरम्यान त्याचा इकाॅनाॅमी रेट 7.22 राहिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळाडूंना मिळाले नित्कृष्ट दर्जाचे मेडल, पदकांचा रंग एका आठवड्यात उडाला!
2025च्या आयपीएलमध्ये ‘या’ 3 संघांच्या कर्णधारपदासाठी अश्विन ठरु शकतो उत्तम पर्याय?
श्रीलंका दौऱ्यावर भारताचे हे 3 महान फलंदाज फ्लॉप, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी संघातून होऊ शकते हकालपट्टी