सध्या भारताच्या कुस्तीमध्ये चांगलीच खळबळ माजली आहे. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध भारतीय कुस्तीपटूंनी आंदोलन सुरू केले आहे. भारतीय अव्वल कुस्तीपटूंनी लावलेल्या आरोपांमुळे कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंग यांच्यासोबतच क्रीडामंत्री अनुराग ठाकूर हेदेखील चिंतेत पडले आहेत. त्यामुळेच आता क्रीडा मंत्रालयदेखील कुस्तीपटूंची समजूत काढण्यासाठी आटापिटा करत आहे. त्यामुळे गुरुवारी (दि. 19 जानेवारी) रात्री क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंची भेट घेतली. हाती आलेल्या माहितीनुसार, क्रीडा मंत्र्यांनी कुस्तीपटूंपुढे 3 प्रस्तावही ठेवले.
बुधवारी (दि. 18 जानेवारी) महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण आणि कुस्तीपटूंचा मानसिक छळ यांसारखे गंभीर आरोप लावत विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी संपूर्ण देशभरात एकच खळबळ माजवली. त्यानंतर आता हे तिन्ही कुस्तीपटू आंदोलनाला बसले आहेत. तसेच, बृजभूषण शरण सिंग (Brij Bhushan Sharan Singh) यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
@PMOIndia @AmitShah @ianuragthakur @PTUshaOfficial pic.twitter.com/yayk3uqjs3
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) January 20, 2023
क्रीडा मंत्र्यांनी दिले 3 प्रस्ताव
कुस्तीपटूंच्या आंदोलनानंतर खडबडून जागे झालेल्या क्रीडा मंत्रालयाने गुरुवारी त्यांची दोनदा भेट घेतली. दिवसभरात पहिल्यांदा मंत्रालयातील काही अधिकाऱ्यांसोबत त्यांची बैठक झाली, तर त्यानंतर रात्री उशिरा क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांच्यासोबत चर्चा झाली. यावेळी कुस्तीपटूंनी त्यांच्यापुढे आपल्या तक्रारी मांडल्या. तसेच, क्रीडा मंत्र्यांनी त्यांच्याकडून प्रकरण मिटवण्याचा प्रस्ताव मांडला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास 4 तासांच्या बैठकीत अनुराग ठाकूर यांनी तीन प्रस्ताव खेळाडूंपुढे ठेवले.
त्यापैकी एक म्हणजे, लैंगिक शोषणासाठी तीन सदस्यांची समितीत बनवली जाईल. आंदोलन करणारे कुस्तीपटूच या तीन सदस्यांचे नाव सुचवतील, जे तपास करतील. दुसरा प्रस्ताव असा की, “आम्ही कुस्ती संघाच्या अध्यक्षांना बरखास्त करू शकत नाही. कारण, ते एका निवडलेल्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. जोपर्यंत तपास समिती त्यांचा अहवाल देणार नाहीत, तोपर्यंत बृजभूषण शरण सिंग स्वत:ला कुस्ती संघापासून वेगळे करतील. तसेच, कुणाला तरी प्रभारी अध्यक्ष बनवले जाईल.” यानंतर तिसरा प्रस्ताव म्हणजे, ज्या प्रशिक्षकांवर गंभीर आरोप आहे, त्यांनाही तपास पूर्ण होईपर्यंत कुस्ती संघापासून वेगळे व्हावे लागेल.
#Jantar mantar pic.twitter.com/calKOipydH
— Bajrang Punia 🇮🇳 (@BajrangPunia) January 18, 2023
लैंगिक शोषणावर दिली नाही कोणतीही माहिती नाही
असे असले तरीही, हैराण करणारी माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, लैंगिक शोषणाच्या आरोपांवर कुस्तीपटू या बैठकीदरम्यान कोणतीही ठोस माहिती देऊ शकले नाही. इतकेच नाही, तर खेळाडूंनी म्हटले होते की, ते सकाळी पुन्हा येतील आणि सरकारपुढे प्रस्तावाबद्दल चर्चा करतील. मात्र, शुक्रवारी दुपारपर्यंत हे खेळाडू त्यांच्याकडे पोहोचले नव्हते.
इतकेच नाही, तर माध्यमांमध्ये सांगितलं जात आहे की, लैंगिक शोषणाचे आरोप लावणाऱ्या दोन वेळच्या जागतिक अजिंक्यपद पदक विजेती विनेश फोगट स्वत: टोकियो ऑलिंपिकदरम्यान संघाच्या ड्रेसऐवजी तिच्या स्पॉन्सरच्या ड्रेसमध्ये मॅटवर उतरली होती. यावर नंतर तिला कुस्ती संघ आणि भारतीय ऑलिंपिक संघटनेकडून ओरडा खावा लागला होता. मात्र, तरीही कुस्ती संघाने तिच्याविरुद्ध कोणतीही शिस्तभंगाची कारवाई केली नव्हती. (indian wrestlers protests vinesh phogat bajrang punia meeting anurag thakur sports minister 3 proposals wfi read here)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय कुस्तीत खळबळ! महिला कुस्तीपटूंचे अध्यक्ष बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप, आंदोलनाला सुरुवात
कुस्तीगीरांच्या मानधनात तीनपटीने वाढ, देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; राज्य सरकार ‘मिशन ऑलिम्पिक’ राबवणार