Friday, February 3, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय कुस्तीत खळबळ! महिला कुस्तीपटूंचे अध्यक्ष बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप, आंदोलनाला सुरुवात

January 18, 2023
in कुस्ती, टॉप बातम्या
Photo Courtesy: Twitter/Facebook

Photo Courtesy: Twitter/Facebook


बुधवारी (18 जानेवारी) भारतीय क्रीडा क्षेत्रातून मोठी खळबळजनक बातमी समोर आली. ऑलिंपिक पदक विजेते कुस्तीपटू साक्षी मलिक (Sakshi Malik), बजरंग पुनिया (Bajrang Punia) तसेच तीन वेळा राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी विनेश फोगट (Vinesh Phogat) यांच्यासह अनेक नामांकित कुस्तीपटू दिल्ली येथे उपोषणास बसले. भारतीय कुस्ती महासंघ व महासंघाचे अध्यक्ष खासदार बृजभूषण सिंग यांच्या विरोधात या सर्व कुस्तीपटूंनी आपल्या तक्रारींचा पाढा वाचला आहे. तसेच, विनेश व साक्षी यांनी बृजभूषण यांच्यावर महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे.

दिल्ली येथील जंतर मंतर या ठिकाणी देशभरातील हे प्रसिद्ध कुस्तीपटू एकवटले. कुस्ती महासंघ खेळाडूंना पाठिंबा देत नसल्याचा आरोप त्यांनी लावला. तसेच, बृजभूषण यांच्या मर्जीतील अनेक प्रशिक्षक राष्ट्रीय सराव शिबिरांमध्ये प्रशिक्षण देतात व ते महिला खेळाडूंवर अत्याचार करत असल्याचे या खेळाडूंनी म्हटले. तसेच विनेशने स्वतः अध्यक्ष यांनीच अनेक मुलींचे शोषण केल्याचा गंभीर आरोप केला. तसेच त्यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे देखील तिने म्हटले.

टोकियो ऑलम्पिकमध्ये भारताला पदक मिळवून देणाऱ्या बजरंगने ही संपूर्ण कार्यकारणी बरखास्त करण्याची तसेच ब्रजभूषण यांना हटवण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली. या आंदोलनात सत्यवर्त कादियान, संगीता मोर तसेच अनेक प्रशिक्षकही सहभागी झाले आहेत.

मागील अनेक वर्षांपासून भाजपचे खासदार बृजभूषण सिंग हे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आहेत. त्यांनी हे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचे म्हटले आहे. पुणे येथे मागील आठवड्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेवेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच, काही महिन्यांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून आक्रमक भूमिका घेतल्याने ते चर्चेत आलेले.

(Indian Wrestlers Protest Against WFI President BrijBhushan Singh Alleged Sexual Harrasment By Vinesh Phogat)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गिलने मैदान मारलं! शुबमनचे न्यूझीलंडविरुद्ध विक्रमी द्विशतक, गोलंदाजांची मोडली कंबर 
तूच रे पठ्ठ्या! गिलने शतक ठोकताच नावावर मोठ्या विक्रमाची नोंद, विराट अन् धवनलाही टाकले मागे


Next Post
Photo Courtesy: Twitter/Blackcaps

हैदराबादमध्ये ब्रेसवेलचा 'वन मॅन शो'! स्फोटक खेळीने तमाम क्रिकेटप्रेमींना केले खूश

Photo Courtesy: Twitter/ICC

पहिल्या वनडेत टीम इंडियाचा रोमांचक विजय! ब्रेसवेलची एकाकी झुंज अपयशी, सिराजची चालली जादू

Photo Courtesy: Twitter/BCCI

घरच्या मैदानावर 'मियॉं मॅजिक'! सिराजच्या धारदार गोलंदाजीने पालटला सामन्याचा नूर

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143