---Advertisement---

‘रनमशीन’ विराटचा आयपीएलमध्येही बोलबाला! ‘असा’ कारनामा करत घातली मोठ्या विक्रमाला गवसणी

On: रविवार, सप्टेंबर 26, 2021 10:01 PM
---Advertisement---

रविवारचा (२६ सप्टेंबर) दिवस क्रिकेट चाहत्यांसाठी मेजवानी ठरला. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या रोमांचक सामन्यात चेन्नई संघाने २ गडी राखून विजय मिळवला होता. दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे दोन्ही संघ आमने सामने होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विराट कोहली सलामीला फलंदाजी करण्यासाठी आला होता. या दरम्यान अर्धशतकी खेळी करत मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीने १५ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर १ धाव घेत तुफानी अर्धशतक झळकावले. यासह तो आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळेस ५० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे. परंतु त्याला मिळालेल्या या सुरुवातीचा फायदा करून घेता आला नाही. तो अवघ्या ४२ चेंडूंमध्ये ५१ धावा करत माघारी परतला. या खेळी दरम्यान त्याने ३ चौकार आणि ३ षटकार मारले होते.

विराट कोहलीने शिखर धवनला मागे टाकत, आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळेस ५० धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत सर्वोच्च स्थान गाठले आहे. विराटने ४७ वेळेस असा कारनामा केला आहे, तर शिखर धवनने हा कारनामा ४६ वेळेस केला आहे. तसेच रोहित शर्माने ४१ वेळेस, सुरेश रैनाने ४० आणि गौतम गंभीरने ३६ वेळेस असा कारनामा केला आहे.

आयपीएल स्पर्धेत सर्वाधिक वेळेस ५० पेक्षा अधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
४७ वेळेस – विराट कोहली*
४६ वेळेस – शिखर धवन
४१ वेळेस – रोहित शर्मा
४० वेळेस – सुरेश रैना
३६ वेळेस – गौतम गंभीर

आणखी एक मोठा विक्रम केला आपल्या नावावर
विराट कोहलीने आपल्या टी-२० कारकिर्दीतील ३१४ व्या सामन्यात १० हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम केला आहे. या यादीत दुसऱ्या स्थानी रोहित शर्मा आहे. रोहितने ३५१ टी-२० सामन्यांमध्ये ९३४८ धावा केल्या आहेत, तर सुरेश रैना ८६४९ धावा आणि शिखर धवनने ८६१८ धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-
-शेवटच्या चेंडूवर सामना जिंकून देण्यात मुंबई सरस की चेन्नई भारी? वाचा थोडक्यात
-भावनेच्या भरात वाहून गेला व्यंकटेश अय्यर; आऊट झाल्यानंतरही लावली डीआरएसची वाट
-CSKvsKKR: जडेजाच्या धुव्वादार खेळीने केकेआरच्या तोंडून हिसकावला सामना, सीएसकेचा २ विकेट्सने विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---