काही दिवसांपूर्वीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तान खेळाडूंची वार्षिक मानधन कराराची यादी जाहीर केली आहे. पीसीबीने खेळाडूंचे विभाजन अ, ब, क आणि एमर्जिंग खेळाडू असे चार श्रेणीत केले आहे.
अ श्रेणीमध्ये ३ खेळाडूंचा, ब श्रेणीत ९ आणि क श्रेणीत ६ खेळाडूंचा समावेश आहे. तसेच एमर्जिंग खेळाडूंच्या श्रेणीत ३ युवा खेळाडूंचा समावेश आहे. यातील अ श्रेणीतील खेळाडूंना प्रत्येकी १,१००,००० पाकिस्तानी रुपये म्हणजेच भारतीय रुपयांनुसार ५,१३,०२२ रुपये मिळणार आहेत. तसेच ब श्रेणीतील खेळाडूंना ७,५०,००० पाकिस्तानी रुपये तर क श्रेणीतील खेळाडूंना ५,५०,००० पाकिस्तानी रुपये मिळणार आहेत.
त्यामुळे भारत आणि पाकिस्तानच्या खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनची तुलना केली तर यात जमीन-आस्मानाचा फरक आहे.
भारतीय खेळाडूंच्या वार्षिक मानधन कराराच्या यादीत ४ श्रेणी करण्यात आल्या आहेत. यात अ+, अ, ब, आणि क अशा चार श्रेणींचा समावेश आहे. अ+ श्रेणीमधील खेळाडूंना ७ कोटी रुपयांचे मानधन मिळते. तसेच अ श्रेणीतील खेळाडूंना ५ कोटी, ब श्रेणीतील खेळाडूंना ३ कोटी आणि क श्रेणीतील खेळाडूंना १ कोटी एवढे वार्षिक मानधन मिळते.
त्यामुळे जर ही तुलना करायची झाली तर पाकिस्तानच्या अ श्रेणीतील क्रिकेटपटूंना मिळून भारतीय रुपयांनुसार १५,३९,०६६ रुपये, ब श्रेणीतील क्रिकेटपटूंना मिळून ३१,४८,०९२ रुपये आणि क श्रेणीतील क्रिकेटपटूंना मिळून १५,३९,०६६ रुपये मिळतात. म्हणजेच तीन्ही श्रेणीतील क्रिकेटपटूंना मिळून ६२,२६,२२४ रुपये मिळतात.
हा विचार केला तर भारताच्या क श्रेणीतील एका क्रिकेटपटूलाही १ कोटी मानधन मिळते. म्हणजे भारताच्या क श्रेणीतील खेळाडूलाही पाकिस्तानच्या मानधन यादीत सर्व खेळाडूंना मिळून मिळणाऱ्या मानधनापेक्षा अधिक रक्कम मिळते.
ट्रेंडिंग घडामोडी –
टेनिस क्रिकेटची पंढरी ‘जुन्नर’ तालुक्यातील क्रिकेटपटूंची ड्रिम ११
रमीज राजाच्या भारत- पाकिस्तान ड्रीम ११मध्ये केवळ १ भारतीय गोलंदाज
असं काय कारण घडलं की कैफने विराटवर केली जोरदार टीका