---Advertisement---

संतापजनक! आशिया कप फायनल पाहण्यासाठी भारतीयांना ‘नो एन्ट्री’; धक्के देत काढले बाहेर

---Advertisement---

दुबई येथे पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या दरम्यान आशिया चषक 2022 चा अंतिम सामना खेळला जात आहे. मात्र, हा सामना सुरू असताना मैदानाच्या बाहेर एक संतापजनक घटना घडल्याची बातमी समोर येत आहे. हा सामना पाहण्यासाठी चाललेल्या भारत आर्मी या भारतीय चाहत्यांच्या गटाला पोलिसांनी मैदानात प्रवेश दिला नाही. भारत आर्मीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ पोस्ट करत आयसीसी व आशिया क्रिकेट परिषदेला जाब विचारला आहे.

भारतीय क्रिकेट संघ आशिया चषकाच्या अंतिम सामन्यासाठी पात्र होऊ शकला नाही. मात्र, भारतीय चाहत्यांचा गट भारत आर्मी हा अंतिम सामना पाहण्यासाठी उत्सुक होता. त्यांच्याकडे सामन्याची अधिकृत तिकिटे असताना देखील त्यांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला जात नाही. भारत आर्मीच्या ट्विटर हँडलवरून पोस्ट केल्या गेलेल्या या व्हिडिओमध्ये तीन चाहते याविषयीचा उलगडा करताना दिसतायेत. या सामन्यात तुम्ही भारताची जर्सी घालून येऊ शकत नाही. तसेच, श्रीलंका अथवा पाकिस्तानच्या जर्सी घातली असेल तरच तुम्हाला मैदानात प्रवेश मिळेल. अन्य एका तर आम्हाला थेट धक्के मारून बाहेर काढण्याचे म्हटले.

या ट्विटमध्ये लिहीले आहे की, भारताची जर्सी घातलेल्या चाहत्यांना मैदानात प्रवेश दिला जात नाही. ही वागणूक अतिशय संतापजनक आहे. आयसीसी व एसीसी यांनी याकडे लक्ष द्यावे. पोलीस आणि आयोजक भारतीय प्रेक्षकांना आत येण्यास मनाई करतायेत.

भारत आर्मी हा जगभरातील भारतीय चाहत्यांचा समूह आहे. भारतीय संघ कोणत्याही ठिकाणी खेळत असला तरी हे चाहते मैदानावर उपस्थित असतात.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या – 

Asia Cup 2022 Final: पाकिस्तानने टॉस जिंकून अर्धा सामना घातला खिशात! पाहा दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन
“विलियम्सनला कर्णधार म्हणून हटविण्याची वेळ आली”; न्यूझीलंडच्याच दिग्गजाने व्यक्त केले रोखठोक मत

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---