भारत आणि श्रीलंका संघातील तिसरा टी२० सामना रविवारी (२७ फेब्रुवारी) धरमशालाच्या मैदानावर पार पडला. या सामन्यात उभय संघाच्या खेळाडूंना वेगवेगळे विक्रम आपल्या नावावर केले. त्यातील सर्वाधिक लक्ष वेधले, ते भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यरच्या विक्रमाने. अय्यरने असा काय कारनामा केला आहे, चला तर जाणून घेऊया…
झाले असे की, नाणेफेक जिंकत श्रीलंका संघाने फलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी श्रीलंकेने ५ विकेट्स गमावत निर्धारित २० षटकात १४६ धावा करत भारताला १४७ धावांचे आव्हान दिले होते. यावेळी भारतीय संघाकडून फलंदाजीसाठी रोहित शर्मा आणि संजू सॅमसन आले होते. मात्र, डावाच्या दुसऱ्याच षटकात रोहित ५ धावांवर तंबूत परतला. यानंतर फलंदाजीला श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आला. श्रेयसने फलंदाजीला आल्यानंतर पहिल्या चेंडूवर १ धाव घेतली. मात्र, त्यानंतर त्याने धमाकेदार फलंदाजी करत चौकारांचा पाऊस पाडला.
श्रीलंकेकडून डावाचे १२ वे षटक टाकण्यासाठी चमिका करुणारत्ने आला होता. ११ व्या षटकापर्यंत श्रेयसने २८ चेंडूत आपल्या ४४ धावा पूर्ण केल्या होत्या. मात्र, करुणारत्नने टाकलेल्या १२ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर श्रेयसने षटकार ठोकला आणि आपले अर्धशतक पूर्ण केले. विशेष म्हणजे त्याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांमध्येही अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे या अर्धशतकासोबतच श्रेयसने एक खास विक्रम केला.
श्रेयस सलग तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यात ५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. श्रेयसपूर्वी माजी कर्णधार विराट कोहलीने २०१६ साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलग तीन अर्धशतक झळकावण्याचा कारनामा केला होता.
FIFTY!
Three consecutive half-centuries for @ShreyasIyer15 👏👏
Live – https://t.co/rmrqdXJhhV #INDvSL @Paytm pic.twitter.com/WjbDmJOdtU
— BCCI (@BCCI) February 27, 2022
तिसऱ्या टी२० सामन्याविषयी बोलायचं झालं, तर भारताने या सामन्यात ६ विकेट्सने विजय मिळवला आहे. विशेष म्हणजे, तिसरा टी२० सामना जिंकत भारतीय संघाने या मालिकेत श्रीलंका संघाला व्हाईटवॉश दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘या’ संघांतील सामन्याने होणार आयपीएल २०२२ हंगामाची सुरुवात? वाचा सविस्तर
श्रीलंकेविरुद्ध नाबाद ७४ धावा करणाऱ्या अय्यरचे चाहते बनले गावसकर; जोकोविच, फेडररशी केली तुलना