टी२० क्रिकेटने मागील अनेक वर्षात मोठी प्रगती केली आहे. भारताने त्यांचा पहिला सामना १ डिसेंबर २००६ ला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग येथे खेळला होता. तेव्हापासून भारतीय संघ १३४ टी२० सामने खेळला आहे. तसेच भारताकडून ८२ खेळाडू टी२० मध्ये खेळले आहेत. त्यातील १३ खेळाडू हे भारताकडून आत्तापर्यंत केवळ १ सामना खेळले आहेत.
ज्यावेळी टी२० क्रिकेटची सुरुवात झाली त्यावेळी भारताकडून यासाठी विरोध झाला होता. तसेच भारताच्या सचिन तेंडुलकर सारख्या खेळाडूंनीही १ टी२० सामना खेळल्यानंतर या क्रिकेट प्रकारात न खेळण्याचा निर्णय घेतला होता. तर काही खेळाडूंना आत्तापर्यंत भारताकडून केवळ एकच टी२० सामना खेळण्याची संधी मिळाली.
भारताकडून केवळ १ टी२० सामना खेळलेल्या एकूण १३ खेळाडूंमधील मयंक मार्कंडे आणि राहुल चहर यांनी २०१९ ला त्यांचा हा १ सामना खेळला आहे. बाकी ११ भारतीय क्रिकेटपटू २०१७ च्या आधी भारताकडून १ टी२० सामना खेळले आहेत.
भारताकडून केवळ १ टी२० सामना खेळणारे क्रिकेटपटू (Indians who played only 1 T20I) –
दिनेेश मुंगिया – २००६
सचिन तेंडुलकर – २००६
मुरली कार्तिक – २००७
सुदीप त्यागी – २००९
सुब्रमण्यम बद्रिनाथ -२०११
राहुल द्रविड २०११
कर्ण शर्मा – २०१४
श्रीनाथ अरविंद – २०१५
पवन नेगी – २०१६
रिषी धवन – २०१६
परवेझ रसूल – २०१७
मयंक मर्कंडे – २०१९
राहुल चहर – २०१९
ट्रेंडिंग घडामोडी –
२०१०पासून चौथ्या क्रमांकावर वनडेत सर्वाधिक धावा करणारे ५ भारतीय
गांगुली- धोनीत खूप वेगळेपण, जे गांगुलीने केलं त्याच्या बरोबर उलटं धोनीने केलं
मॅच फिक्सिंग होऊ नये म्हणून बीसीसीआय खेळाडूंच्या नकळत करते या गोष्टी