नागपूर। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज(5 मार्च) दुसरा वनडे सामना सुरु आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने 47 षटकात 7 बाद 248 धावा केल्या आहेत.
भारताकडून कर्णधार विराट कोहलीने नाबाद शतक झळकावले असून त्याला अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा चांगली साथ दिली. मात्र जडेजा 21 धावांवर बाद झाला. या सामन्यात जेव्हा जडेजाने 10 वी धाव घेतली तेव्हा त्याने वनडेमध्ये 2000 धावा पूर्ण करत एक खास विक्रम केला आहे.
तो वनडेमध्ये 2000 धावा आणि 150 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेणारा भारताचा तिसराच क्रिकेटपटू बनला आहे. याआधी असा विक्रम फक्त कपिल देव आणि सचिन तेंडूलकर यांनाच करता आला आहे.
कपिल देव यांनी वनडेमध्ये 3783 धावा आणि 253 विकेट्स घेतल्या आहेत. तर सचिनने 18426 धावा आणि 154 विकेट्स घेतल्या आहेत.
जडेजाने आत्तापर्यंत 148 सामन्यात 35.60 च्या सरासरीने 171 विकेट्स घेतल्या आहेत.
वनडे क्रिकेटमध्ये २ हजार धावा आणि १५०+ विकेट्स घेणारे भारतीय अष्टपैलू
१८४२६ धावा, १५४ विकेट्स- सचिन तेंडूलकर
३७८३ धावा, २५३ विकेट्स- कपिल देव
२००२ धावा, १७१ विकेट्स- रविंद्र जडेजा#RavindraJadeja #KapilDev #SachinTendulkar #म #मराठी #INDvsAUS #Indvaus #Nagpur #Vidarbha— Sharad Bodage (@SharadBodage) March 5, 2019
महत्त्वाच्या बातम्या –
–तब्बल ९ वर्षांनी एमएस धोनीवर आली अशी वेळ
–नागपुरच्या भूमीवर किंग कोहली ठरला कूल धोनीला सरस
–जगातील ४८८ कर्णधारांना न जमलेली गोष्ट किंग कोहलीने ६ वर्षांत करुन दाखवली