नेदरलँड्सचा माजी अष्टपैलू खेळाडू रायन टेन डोशेट (Ryan ten Doeschate) जेव्हा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून भारतीय संघात सामील झाला तेव्हा त्याला वाटले नव्हते की फिरकीला सामोरे जाणे ही त्याची एक जबाबदारी असेल, पण आता तो भारताच्या आगामी घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यांची ही भूमिका स्वीकारणार आहे. आगामी दिवसांमध्ये भारताला मायदेशात बांगलादेशविरुद्ध 2 आणि न्यूझीलंडविरुद्ध 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. त्यामुळे भारतीय खेळाडूंना फिरकी गोलंदाजांविरुद्ध उत्कृष्ट कामगिरीची आवश्यकता असणार आहे.
रायन टेन डोशेट (Ryan ten Doeschate) टॉकस्पोर्ट क्रिकेटशी बोलताना म्हणाले की, “हे (फिरकीला सामोरे जाण्याची जबाबदारी) त्या आव्हानांपैकी एक होते ज्याचा मी विचार केला नव्हता. श्रीलंकेत आम्हाला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही.”
रायन टेन डोशेट म्हणाले, “भारतीय संघाची अशी मानसिकता राहिली आहे की, परदेशात चांगली कामगिरी करुन उत्साही राहायचे. सध्या संघाचे लक्ष ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या देशांमध्ये सुधारण्यावर केंद्रित करण्यात आलं आहे. फिरकी गोलंदाजी चांगली खेळणे हा नेहमीच भारतीय संघाचा मजबूत मुद्दा होता आणि येथे भारतीय संघाच्या कामगिरीत थोडीशी घसरण झाली आहे. मी खेळाडूंना मदत करू शकेन या उद्देशाने पुढे जात आहे. जेणेकरून भारतीय खेळाडू पुन्हा एकदा फिरकीपटूंविरुद्ध जगातील सर्वोत्तम बनू शकतील.”
पुढे बोलताना रायन टेन डोशेट (Ryan ten Doeschate) म्हणाले, “मला वाटत नाही की, भारतीय खेळाडूंना वेगळ्या टेक्निकच्या ज्ञानाची गरज आहे. आपलं काम फक्त त्यांना मानसिकता देणं, परिस्थितीची जाणीव करून देणं, त्यांना नवीन कल्पना देणं आणि वातावरण योग्य ठेवणं एवढंच असेल आणि हेही खूप महत्त्वाचं आहे.”
शेवटच्या श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताला निराशाजनक पराभवाचा सामना करावा लागला. या दौऱ्यावर भारतीय संघ एकही सामना जिंकू शकला नाही. दोन्ही संघांमधील पहिला सामना टाय झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेनं भारताला 32 धावांनी पराभूत केलं, तर तिसऱ्या सामन्यात 110 धावांनी भारताचा धुव्वा उडवून 2-0ने मालिका खिशात घातली. तिन्ही सामन्यात भारतीय फलंदाज श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांपुढे टिकू शकले नाहीत. भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) तिन्ही सामन्यात फिरकीविरुद्ध एलबीडब्ल्यू बाद झाला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
मेगा लिलावापूर्वी रोहित-हार्दिकसह मुंबई इंडियन्सच्या स्टार खेळाडूंची होणार सुट्टी?
53 वर्षात केवळ 12 द्विशतक; वनडेमध्ये हा विश्वविक्रम करणारे चक्क इतके भारतीय खेळाडू
आगामी आयपीएलमध्ये रिषभ पंत चेन्नईमध्ये होणार दाखल? फोटो शेअर करुन दिली मोठी हिंट