लक्ष्य सेनचा (Lakshya Sen) कांस्यपदक सामन्यात पराभव झाला. भारतीय शटलरनं पहिला गेम 21-13 असा जिंकला. यानंतर दुसऱ्या गेमच्या एका टप्प्यावर लक्ष्यनं 8-2 अशी आघाडी घेतली होती. मात्र, यानंतर मलेशियाच्या खेळाडूनं जोरदार पुनरागमन करत 11-8 ने आघाडी घेतल्यानंतर दुसरा गेम 21-16 असा जिंकला. यानंतर ली जियाने तिसऱ्या आणि निर्णायक गेममध्ये पूर्णपणे वर्चस्व राखले आणि 21-11 असा विजय मिळवला.
सामन्यासोबतच त्यानं कांस्यपदकही पटकावलं. लक्ष्यनं सामन्यात अनेक अनफोर्स्ड चुका केल्या आणि मलेशियाच्या खेळाडूला स्मॅशनंतर फटके मारण्याची संधी दिली. इतिहासाच्या पुस्तकात नाव नोंदवण्यापासून लक्ष्य सेन चुकला. याआधी लक्ष्यला उपांत्य फेरीत व्हिक्टर एक्सेलसेनकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
मलेशियाच्या ली जी जिया आणि लक्ष्य सेन यांच्यातील सामन्यांबद्दल बोलायचं झालं, तर भारतीय शटलरचा वर्चस्व राहिलं आहे. हे दोन खेळाडू आतापर्यंत 5 वेळा भिडले आहेत. यापैकी सर्व सामने लक्ष्य सेननं जिंकलं आहे. लक्ष्य सेननं यावर्षी ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्येही ली जी जियाचा पराभव केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
इशान किशन पुनरागमनासाठी सज्ज, 15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या ‘या’ प्रतिष्ठित स्पर्धेत खेळताना दिसणार
प्रशिक्षक गंभीरच्या ‘रिपोर्ट कार्ड’वर पहिली फुल्ली, वेळीच ‘या’ चुका सुधारल्या नाहीत तर हातून निसटेल मालिका!
अश्विनने जेव्हा द्रविडसमोरच केली त्याची नक्कल, माजी प्रशिक्षकाची रिऍक्शन होती पाहण्यासारखी