भारतीय क्रिकेट संघाला येत्या १८ ऑगस्टपासून झिम्बाब्वे संघाविरुद्ध ३ सामन्यांची वनडे मालिका खेळायची आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघ झिम्बाब्वेला पोहोचला आहे. २७ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक २०२२ हंगामापूर्वी भारतीय संघाची ही शेवटची मालिका असणार आहे. या मालिकेसाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) त्यांच्या प्रशिक्षण विभागातील सर्व दिग्गजांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवीन चेहऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
झिम्बाब्वे दौऱ्यासाठी (India Tour Of Zimbabwe) बीसीसीआयने राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) यांना मुख्य प्रशिक्षकपदी निवडले आहे. लक्ष्मण यांच्याकडे ही जबाबदारी देण्याचे कारण म्हणजे आशिया चषकासाठी भारतीय संघ २० ऑगस्ट रोजी युएईला उड्डाण भरणार आहे. त्या संघासोबत नियमित मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड जातील. झिम्बाब्वे दौऱ्यावर कर्णधार असलेला केएल राहुल व दीपक हुडा हे झिम्बाब्वे दौऱ्यानंतर हरारेवरून थेट दुबई येथे दाखल होतील.
बीसीसीआय सचिव जय शहा यांनी याबाबत माहिती देताना म्हटले होते की, “द्रविड (Rahul Dravid) यांना विश्रांती दिली गेली नाही. केवळ दोन्ही संघांना योग्य प्रशिक्षक लाभावेत यासाठी या दोन्ही दिग्गजांकडे दोन वेगवेगळे संघ सोपवले गेलेत.”
फलंदाजी आणि गोलंदाजी प्रशिक्षकही बदलले
भारताचे विद्यमान मुख्य प्रशिक्षक द्रविड यांच्याबरोबरच फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड आणि गोलंदाजी प्रशिक्षक पारस महांब्रे यांनाही विश्रांती देण्यात आली आहे. आता झिम्बाब्वेविरुद्ध फलंदाजी प्रशिक्षक म्हणून हृषिकेश कानिटकर (Hrishikesh Kanitkar) आणि गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून साईराज बहुतुले (Sairaj Bahutule) काम पाहतील.
अचानक कर्णधारही बदलण्यात आला
दरम्यान झिम्बाब्वे दौऱ्यासाठी फक्त प्रशिक्षकच नव्हे तर कर्णधारही बदलण्यात आले आहेत. भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार रोहित शर्मा या दौऱ्याचा भाग नसल्याने त्याच्या जागी अनुभवी शिखर धवन याला प्रभारी कर्णधार करण्यात आले होते. मात्र ऐन दौऱ्याआधी यापूर्वी घोषित झालेला कर्णधार धवनच्या जागी पुनरागमन करत असलेल्या केएल राहुलची नियुक्ती केली गेली आहे.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
…आणि त्या दिवशी १०० शतकांचा पाया रचला गेला
अखेर चाहत्यांच्या मागणीला यश! लिजेंड्स लीगमधून गिब्सचा काढता पाय; हा ऑसी दिग्गज घेणार जागा
स्वातंत्र्याच्या ७५व्या वर्षी आयोजित विशेष सामन्यात शेन वॉटसन अन् डॅनियल विटोरी होणार सहभागी