आशियाई गेम्स 2023 मध्ये भारतीय संघाचे जोरदार प्रदर्शन मंगळवारीही सुरूच राहिले. घोडेस्वारी स्पर्धेत भारताच्या चार सदस्यीय मिश्र संघाने सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला. या संघात ह्रदय छेडा, दिव्यकृती, दुपीप्ति हजेला आणि अनुष अग्रवाल या चौघांचा समावेश आहे. भारताला घोडेस्वारी स्पर्धेत तब्बल 41 वर्षांनंतर सुवर्णपदक मिळाले आहे. आशिया गेम्सच्या चालू हंगामात भारताला मिळालेले हे तिसरे सुवर्णपदक आहे.
घोडेस्वारी स्पर्धेत मिश्र संघाने मंगळवारी (26 सप्टेंबर) भारताने सुवर्णपदक जिंकले. ह्रदय छेडा, दिव्यकृती, सुदीप्ति हजेला आणि अनुष अग्रवाल यांनी भारताचे प्रतिनिधित्व करताना अप्रतिम प्रदर्शन केले. परिणामी आशियाई गेम्स 2023 मध्ये तिसरे सुवर्णपदक भारताला मिळआले. भारतीय संघाने 209.205 गुण मिळवत चिनला मागे टाकले आणि विजेतेपद पटकावले, 204.882 गुणांसह चिन दुसऱ्या क्रमांकावर, तर 204.852 गुणांसह हाँगकाँग संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला. 41 वर्षांनंतर भारताला या स्पर्धेत सुवर्णपदक मिळाले असून आपले शेवटचे सुवर्णपदक घोडेस्वार संघाने 1982 साली जिंकले होते.
???????????????????????????? ???????????????????????? – ????????????????????????????????????????
???? | Here’s the moment when India’s Equestrian Dressage team created history by clinching a????after a long wait of 41 years ????????#SonySportsNetwork #Cheer4India #Hangzhou2022 #IssBaar100Paar #Equestrian | @Media_SAI pic.twitter.com/MjvO5bAYq2
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) September 26, 2023
दरम्यान, मंगळवारी हे सुवर्णपदक जिंकण्याआधी भारतीय संघाला आशियाई गेम्समध्ये (Asian Games 2023) दोन सुवर्ण पदक शुटिंग आणि महिला क्रिकेट स्पर्धेत मिळाले. शुटिंगमध्ये 10 मीटिर एअर रायफल स्पर्धेत रुद्राक्ष पाटिल, दिव्यांश पवार आणि एश्वर्या प्रतावसिंग तोमर यांनी अप्रतिम प्रदर्शन केले होते. तर महिला क्रिकेट स्पर्धेत हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वात भारताने अंतिम सामना श्रीलंकेविरुद्ध जिंकला. आतापर्यंत आशियाई गेम्सच्या चालू हंगामात भारताची पदकसंख्या 15 पर्यंत पोहोचली आहे. (India’s Equestrian Dressage team created history by clinching Gold after a long wait of 41 years)
महत्वाच्या बातम्या –
विश्वचषकासाठी अफगाणिस्तान संघ भारतात दाखल! राशिद खानसह सर्वांचे सुटा-बुटातील फोटो पाहाच
वर्ल्डकप स्पेशल: World Cupमध्ये सर्वाधिक धावा करणारे Top 10 कर्णधार; यादीत फक्त दोनच भारतीय