---Advertisement---

या सामन्यानंतर एमएस धोनी घेणार निवृत्ती?

On: बुधवार, जुलै 3, 2019 6:58 PM
---Advertisement---

इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु असलेल्या 2019 विश्वचषकातील भारतीय संघाचा शेवटचा सामना हा भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीचाही शेवटचा सामना असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याबद्दल बीसीसीआयच्या एका अधिकारीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले आहे की ‘तूम्ही एमएस धोनीबद्दल काही सांगू शकत नाही. पण तो या विश्वचषकानंतर पुढे भारताकडून खेळत राहिल याची शक्यता कमी आहे. त्याने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जसा अचानक घेतला होता, त्यावरुन त्याच्याबद्दल सध्या काही अंदाज बांधणे कठीण आहे.’

तसेच सध्या कार्यरत असलेली निवड समीतीचा कार्यकाल ऑक्टोबरपर्यंत राहणार असल्याची शक्यता आहे. तसेच ते निश्चितपणे या वनडे विश्वचषकानंतर पुढीलवर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या आयसीसी टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची बांधणी करण्यास सुरुवात करतील.

असे असले तरी भारतीय संघ 2019 च्या वनडे विश्चषकात उपांत्य फेरीत पोहचल्याने या मुद्द्यावर संघ व्यवस्थापक आणि बीसीसीआय कोणतेही भाष्य करण्यास इच्छित नाही.

धोनीने या विश्वचषकात सात सामन्यात जवळजवळ 93 च्या स्ट्राईक रेटने 223 धावा केल्या आहेत. ही आकडेवारी चांगली असली तरी पण तो या विश्वचषकात स्ट्राईक रोटेट करताना संघर्ष करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्याच्यावर टीकाही झाली आहे.

पण भारतीय संघातील खेळाडूंनी त्याला पाठिंबा देताना तो संघात महत्त्वाचा असल्याचे म्हटले आहे.

एका माजी भारतीय खेळाडूने म्हटले आहे की ‘संघ व्यवस्थापनाने 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वेळीच स्पष्ट केले होते की 2019 च्या विश्वचषकापर्यंत धोनीला संघात ठेवण्याची त्यांची इच्छा आहे. भारतीय संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केल्याने त्याच्या साधारण कामगिरीचा बचाव झाला आहे. धोनीला कोणीही निवृत्ती घे असे म्हणणार नाही, पण विश्वचषकानंतर गोष्टी बदलतील.’

या विश्वचषकानंतर जर खरंच धोनी निवृत्ती घेणार असेल तर भारतीय संघ 2019 विश्वचषक जिंकून धोनीला अविस्मरणीय भेट देऊन अलविदा करणार का हे पहावे लागेल.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

–…म्हणून रोहित शर्माने या चाहतीला भेट दिली स्वाक्षरी केलेली हॅट

–कशी राहिली अंबाती रायडूची संपुर्ण कारकिर्द?

–आज भारतीय पाठीराखे कुणाला पाठींबा देणार? इंग्लंड की न्यूझीलंड?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment