---Advertisement---

कशी राहिली अंबाती रायडूची संपुर्ण कारकिर्द?

On: बुधवार, जुलै 3, 2019 4:41 PM
---Advertisement---

भारताचा मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायडूने आज(3 जूलै) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

त्याच्या निवृत्तीबद्दल टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार रायडूने बीसीसीआयला इमेलद्वारे निवृत्ती घेत असल्याचे कळवले आहे.

त्याने मेलमध्ये म्हटले आहे की ‘मी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून आणि सर्व स्तरातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. मी बीसीसीआयचे आणि मी प्रतिनिधित्व केलेल्या हैद्राबाद, बडोदा, आंध्रप्रदेश आणि विदर्भ या राज्य क्रिकेट असोसिएशनचे आभार मानतो.’

असे असले तरी त्याच्या अचानक निवृत्तीमागील कारण अजून समजलेले नाही. पण तो मागील अनेक दिवसांपासून 2019 विश्वचषकासाठी भारतीय संघात संधी न मिळाल्याचे चर्चेत होता.

2019 विश्वचषकातून भारताचे शिखर धवन आणि विजय शंकर हे दोन खेळाडू दुखापतग्रस्त होऊन बाहेर पडल्यानंतरही राखीव खेळाडू असलेल्या अंबाती रायडूला भारतीय संघात संधी मिळालेली नाही. रायडूच्या निवृत्ती मागे हे एक कारण असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अशी आहे अंबाती रायडूची कामगिरी – 

रायडूने 2000/01 दरम्यान प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये शेवटचा सामना नोव्हेंबर 2017 मध्ये हैद्राबादकडून आसामविरुद्ध खेळला आहे. या सामन्यात तो हैद्राबादचा कर्णधारही होता. पण त्याने मागीलवर्षी मर्यादीत षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

त्याने त्याच्या कारकिर्दीत 97 प्रथम श्रेणी सामने खेळताना 45.56 च्या सरासरीने 6151 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 16 शतकांचा तसेच 34 अर्धशतकांचा समावेश आहे. 210 ही त्याची प्रथम श्रेणी क्रिकेटमधील सर्वोच्च धावसंख्या आहे.

त्याने 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने भारताकडून झिम्बाब्वे विरुद्ध 24 जूलै 2013 ला पहिला वनडे सामना खेळला. त्यानंतर त्याने भारतीय संघाकडून 6 वर्षे चांगली कामगिरी करताना 55 वनडे सामने खेळले. या 55 सामन्यात त्याने 47.05 च्या सरासरीने 1694 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 3 शतके आणि 10 अर्धशतके केली आहेत.

त्याने त्याचा शेवटचा वनडे सामना यावर्षी 8 मार्चला ऑस्ट्रेलिया विरुद्ध रांचीमध्ये खेळला. त्यानंतर त्याला 2019 विश्वचषकासाठी भारतीय संघात संधी मिळेल अशी आशा होती. परंतू त्याला संधी मिळाली नाही.

रायडूने त्याच्या कारकिर्दीत अ दर्जाचे 160 सामने खेळले असून यात त्याने 5 शतके आणि 37 अर्धशतकांसह 40.82 च्या सरासरीने 5103 धावा केल्या आहेत.

तसेच त्याने भारताकडून 6 टी20 सामने देखील खेळले आहेत. पण यात त्याला केवळ 42 धावा करण्यातच यश आले आहे.

त्याचबरोबर रायडू आयपीएलही यापुढे खेळणार नाही. त्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्सचे प्रतिनिधित्व केले आहे. आयपीएलमध्ये खेळताना त्याने 147 सामन्यात 28.7 च्या सरासरीने 3300 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 1 शतक आणि 18 अर्धशतके केली आहेत.

रायडूने त्याच्या कारकिर्दीत एकूण 216 ट्वेंटी20 क्रिकेटचे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 26.4 च्या सरासरीने 4584 धावा केल्या आहेत.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

आज भारतीय पाठीराखे कुणाला पाठींबा देणार? इंग्लंड की न्यूझीलंड?

व्हिडिओ: टीम इंडियाला पाठिंबा देणाऱ्या कोण आहेत या ८७ वर्षीय आजी, जाणून घ्या

मोठी बातमी – अंबाती रायडूची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment