दक्षिण आफ्रिका संघाने पहिल्या दोन सामन्यात सपाटून पराभव पाहिला. मात्र, तिसऱ्या सामन्यात ‘जिंकूनच दाखवायचं’ या इराद्याने पाहुणा संघ उतरला होता. झालेही तसेच. मंगळवारी (दि. 4 ऑक्टोबर) इंदोर येथे पार पडलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या टी20 सामन्यात भारताला पराभवाचा धक्का बसला. पाहुण्या संघाने भारताला 49 धावांनी पराभूत केले आणि आपली प्रतिष्ठा राखली. मात्र, भारताने ही मालिका 2-1ने खिशात घातली. असे असले, तरीही मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची आकडेवारी फार चांगली राहिली नाहीये. यापूर्वी भारताला धावांचा पाठलाग करताना घरच्याच मैदानावर पराभव पत्करावा लागला आहे.
तिसऱ्या टी20 सामन्यात पहिल्यांदा फलंदाजीला उतरलेल्या दक्षिण आफ्रिका (South Africa) संघाने 20 षटकात 3 विकेट्स गमावत 227 धावा केल्या होत्या. तसेच, भारतापुढे 228 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र, भारतीय (Team India) संघ 18.3 षटकात सर्वबाद फक्त 178 धावाच करू शकला. त्यामुळे भारताला 228 धावांचा पाठलाग करताना 49 धावांनी पराभवाचा धक्का बसला.
यापूर्वी सर्वप्रथम 2009मध्ये नागपूर येथे श्रीलंकेविरुद्धच्या टी20 सामन्यात भारतीय संघ 216 धावांचा पाठलाग करताना 29 धावांनी पराभूत झाला होता. त्यानंतर भारताला 2012मध्ये चेन्नई येथे न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 168 धावांचा पाठलाग करत असताना भारत अवघ्या 1 धावेने पराभूत झाला होता. त्यानंतर भारताला 2016मध्ये पुन्हा नागपूर येथे न्यूझीलंडविरुद्ध खेळताना 127 धावांचा पाठलाग करायचा होता. मात्र, एवढ्या कमी धावसंख्येचा पाठलाग करतानाही भारताला 47 धावांनी पराभूत व्हावे लागले होते. पुढे 2017 मध्ये राजकोटच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात 197 धावांचा पाठलाग करताना भारत 40 धावांनी पराभूत झाला होता.
टी20 क्रिकेटमध्ये घरच्याच मैदानावर आव्हानाचा पाठलाग करताना भारताचे पराभव
216 विरुद्ध- श्रीलंका, नागपूर 2009 (29 धावा)
168 विरुद्ध- न्यूझीलंड, चेन्नई 2012 (1 धाव)
127 विरुद्ध, न्यूझीलंड नागपूर 2016 (47 धावा)
197 विरुद्ध, न्यूझीलंड राजकोट 2017 (40 धावा)
228 vs दक्षिण आफ्रिका, इंदोर 2022 (49 धावा)
तीन सामन्यांची टी20 मालिका आता संपली आहे. मात्र, यानंतर आता भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना 6 ऑक्टोबर रोजी लखनऊ येथे खेळला जाणार आहे. आगामी मालिकेसाठी क्रिकेट चाहतेही भलतेच उत्सुक आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
षटकारांचा पाऊस पाडत दक्षिण आफ्रिकेने भारतभूमीवर रचला इतिहास; अशी कामगिरी करणारा बनला पहिला संघ
दक्षिण आफ्रिकेने प्रतिष्ठा राखली! अखेरच्या सामन्यात टीम इंडियाचा दारूण पराभव






