भारतासाठी 2008 साली पदार्पण करणारा विराट कोहली मागील एका दशकातील सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये सर्वश्रेष्ठ फलंदाज म्हणून नावारूपाला आला आहे. त्याने नुकत्याच काही दिवसापूर्वी महान फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकत वनडेत सर्वात वेगाने 12,000 धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. अशामध्ये भारतीय क्रिकेट संघाचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावसकर आणि ऑस्ट्रेलियाचे माजी सलामीवीर फलंदाज मॅथ्यू हेडन यांनी दशकातील सर्वोत्तम खेळाडूबद्दल सांगितले आहे.
यादरम्यान गावसकर यांनी विराटला दशकातील सर्वश्रेष्ठ खेळाडू म्हटले, तर हेडन यांनी धोनीचे नाव घेतले.
गावसकर यांचे मते विराट दशकातील प्रतिभाशाली खेळाडू
गावसकर स्टार स्पोर्टच्या क्रिकेट कनेक्टेड कार्यक्रमामध्ये म्हणाले, “मला वाटते की जर तुम्ही व्यक्तिगत कामगिरी बघता, तेव्हा निश्चितपणे तो विराट कोहली असेल. धावांचा पाठलाग करताना त्याच्या जोरावर भारतीय संघाने भरपूर सामने जिंकलेत.”
ते पुढे म्हणाले, “मी फक्त धावा आणि विकेटच्या संख्येच्या जागी खेळाडूच्या प्रभावाला पाहतो. आणि या बाबतीत तुम्हाला मानावे लागेल की हे दशक विराट कोहलीचे आहे. भारतीय संघाकडून जिंकल्या गेलेल्या सामन्यात त्याचा प्रभाव जास्त आहे.”
गावसकर यांच्या विचाराशी मात्र ऑस्ट्रेलियाचे माजी सलामी फलंदाज मॅथ्यू हेडन हे सहमत नाही. त्यांचे म्हणणे आहे की एमएस धोनी हा दशकातील सर्वाधिक प्रभावशाली भारतीय फलंदाज आहे. धोनीने या वर्षी ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम- राम ठोकला आहे.
मॅथ्यू हेडन यांनी घेतले धोनीचे नाव
मॅथ्यू हेडन म्हणाले, “हे खूप महत्त्वपूर्ण आणि मुख्य आहे की, धोनीने विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचा किताब जिंकला आहे. माझ्यासाठी विश्वचषकाचा किताब मैलाच्या दगडाप्रमाणे आहे.”
धोनीबाबत पुढे बोलताना ते म्हणाले, “जेव्हा गोष्ट विश्वचषकाची येथे, तेव्हा तुम्हाला चांगल्या कर्णधाराबरोबर मधल्या फळीत शांत आणि दमदार खेळाडूही पाहिजे. ती कौशल्य त्याच्यामधे होती.”
महत्त्वाच्या बातम्या-
टी२० विश्वचषकात ‘या’ खेळाडूने करावे भारतीय संघाचे नेतृत्त्व; पार्थिव पटेलने मांडले मत
ट्रेंडिंग लेख-
शाहरुख खानच्या ५ क्रिकेटवरील जाहिराती, ज्यांनी एकवेळी घातला होता धुमाकूळ
अठरा वर्षांची ‘छोटीशी’ क्रिकेट कारकीर्द खेळलेला ‘पार्थिव पटेल’
अवघ्या अठराव्या वर्षी पार्थिव पटेल खेळला चक्क विश्वचषक; वाचा कशी झाली कारकिर्दीची सुरुवात