2025च्या आयपीएल (IPL) हंगामापूर्वी मेगा लिलाव होणार आहे. मेगा लिलावासाठी सर्व संघांनी बीसीसीआयने दिलेल्या नव्या नियमांनुसार रिटेन्शन यादी जाहीर केली आहे. तत्पूर्वी दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) आपल्या नवीन गोलंदाजी प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. संघाने भारतीय संघाचा माजी वेगवान गोलंदाज मुनाफ पटेलला (Munaf Patel) गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.
मुनाफ पटेल (Munaf Patel) 2011 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा एक भाग होता. आता तो आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी गोलंदाजी प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय लिलावादरम्यान तो अनेक गोलंदाजांच्या निवडीतही महत्त्वाची भूमिका बजावू शकतो.
🚨 BREAKING 🚨
Delhi Capitals has appointed Munaf Patel as their bowling Coach for IPL 2025 🔵 🏏#Cricket #DelhiCapitals #MunafPatel pic.twitter.com/KrvwlItBRe
— Sportskeeda (@Sportskeeda) November 12, 2024
दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) आधीच त्यांच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाची घोषणा केली होती. दिल्लीने रिकी पाॅन्टिंग (Ricky Ponting) माजी भारतीय क्रिकेटपटू हेमांग बदानी यांना संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. याशिवाय सौरव गांगुलीच्या (Sourav Ganguly) जागी वेणुगोपाल राव यांची संघाच्या क्रिकेट संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे आणि आता मुनाफ पटेलला (Munaf Patel) गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्यात आले आहे.
मुनाफ पटेलबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारताला 2011चा विश्वचषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. याशिवाय तो अनेक हंगाम आयपीएलमध्येही खेळला आहे. 2008 मध्ये चॅम्पियन झालेल्या राजस्थान रॉयल्सचा देखील तो एक भाग होता. तो 2008 ते 2010 पर्यंत राजस्थान रॉयल्सकडून खेळला. यानंतर, तो आयपीएल 2011 ते 2013 पर्यंत मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. 2017 मध्ये तो गुजरात लायन्स संघात होता. त्याने आपल्या आयपीएल कारकिर्दीत 63 सामन्यात 74 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानच्या 38 वर्षीय खेळाडूने जिंकला आयसीसी ‘प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार
ICC Ranking; आयसीसी क्रमवारीत भारतीय खेळाडूंची घसरण! टाॅप-20 मध्ये नाही एकही भारतीय
संघाला मोठा झटका! एकदिवसीय मालिकेपूर्वीच स्टार अष्टपैलू बाहेर