24 जानेवारीपासून भारतीय संघाच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध 5 टी20, 3 वनडे आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र हा दौरा सुरु होण्याआधीच भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्याने तो वनडे आणि टी20 मालिकेतून बाहेर पडला आहे.
त्याला रविवारी(19 जानेवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध तिसरा वनडे सामना खेळताना डाव्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्याला या सामन्यात ऑस्ट्रेलिया प्रथम फलंदाजी करत असताना 5 व्या षटकात ऍरॉन फिंचने कव्हरच्या क्षेत्रात मारलेला चेंडू आडवण्याच्या नादात दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याने या सामन्यात फलंदाजीही केली नाही.
याबद्दल बीसीसीआयने काल(21 जानेवारी) माहिती दिली आहे. तसेच बीसीसीआयने 5 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने याआधी काही दिवसांपूर्वीच टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड केली होती.
पण आता टी20 मालिकेसाठी भारतीय संघात एक बदल करताना धवन ऐवजी संजू सॅमसनला संधी देण्यात आली आहे. तसेच वनडे मालिकेसाठी 20 वर्षीय पृथ्वी शॉचा भारतीय संघात समावेश झाला आहे.
त्यामुळे आता शॉला वनडे पदार्पणाची संधी मिळू शकते. शॉची दुखापतग्रस्त धवनच्या जागेवर वनडे संघात निवड झाली आहे.
त्याचबरोबर टी20 प्रमाणेच वनडे संघातही हार्दिक पंड्याला स्थान मिळालेले नाही. यामागे त्याची तंदुरुस्तीचे कारण असण्याची शक्यता आहे. तसेच केदार जाधवलाही वनडे संघात स्थान टिकवण्यात यश आले आहे.
याव्यतिरिक्त बीसीसीआयने वनडे संघात मोठे बदल केलेले नाही.
NEWS: India’s ODI squad against New Zealand announced: Kohli (C), R. Sharma (VC), P. Shaw, Rahul, Shreyas, M. Pandey, Pant (WK), S. Dube, Kuldeep, Chahal, Jadeja, Bumrah, Shami, Saini, S. Thakur, Kedar
Dhawan ruled out of T20I and ODI series. Details – https://t.co/lw5gZey833 pic.twitter.com/5ATv8QTLLe
— BCCI (@BCCI) January 21, 2020
भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्याची सुरुवात 24 जानेवारीपासून टी20 मालिकेने करेल. त्यानंतर 5 फेब्रुवारीपासून 3 सामन्यांची वनडे मालिका सुरु होईल.
न्यूझीलंड दौऱ्यासाठी असा आहे भारतीय टी20 संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), संजू सॅमसन, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी , रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर
न्यूझीलंड दौऱ्यासाठी असा आहे भारतीय वनडे संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), पृथ्वी शॉ, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत (यष्टीरक्षक), शिवम दुबे, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, नवदीप सैनी , शार्दुल ठाकूर, केदार जाधव
न्यूझीलंड दौऱ्यापूर्वी रोहित शर्माने शेअर केला खास फोटो, एक तासातच आल्या १ लाख लाईक्स
वाचा- 👉https://t.co/nnH6LUL68f👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsNZ— Maha Sports (@Maha_Sports) January 21, 2020
भारताचा हा महत्त्वाचा खेळाडू झाला जखमी; न्यूझीलंड दौऱ्यावर जाण्यासाठी प्रश्नचिन्ह
वाचा- 👉https://t.co/jhPcaxvmd6👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvsNZ— Maha Sports (@Maha_Sports) January 21, 2020