आयसीसीच्या पंचाच्या एलिट पॅनलमध्ये असणारे एकमेव भारतीय पंच सुंदरम रवी यांना या पॅनलमधील स्थान गमवावे लागण्याची शक्यता आहे. त्यांना या पॅनलमधून वगळण्याबाबतचा निर्णय आयसीसीच्या पंच समीतीने 24 एप्रिलला झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.
रवी यांचा काही दिवसांपूर्वी 30 मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसीने घोषित केलेल्या 16 पंचाच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. या यादीत समावेश असणारे ते एकमेव भारतीय पंच आहेत.
रवी यांना 2015 मध्ये आयसीसीच्या पंचांच्या एलिट पॅनलमध्ये स्थान मिळाले होते. त्यावेळी 11 वर्षांनंतर भारतीय पंचाचा या पॅनलमध्ये समावेश झाला होता. याआधी भारताचे एस वेंकटराघवन हे 2004मध्ये पंचांच्या एलिट पॅनलमधून निवृत्त झाले होते.
पण आता रवी यांना 2019 च्या विश्वचषकानंतर घोषित होणाऱ्या नवीन एलिट पॅनलमधून वगळण्यात येण्याची दाट शक्यता आहे. या निर्णयाबाबत अजून अधिकृतरित्या कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. याआधीही मागीलवर्षी सी शमशुद्दीन यांना पंचांच्या आयसीसी एमर्जिंग पॅनलमधून काढून टाकण्यात आले होते.
आता आयसीसी एमर्जिंग पॅनलच काढून टाकण्याचा विचार करत आहे. कारण यामध्ये 6 पेक्षा अधिक पंचांना सामील करण्याची परवानगी नाही.
याबद्दल हिंदूस्थान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार एका अधिकारीने सांगितले की ‘दबावाच्या आणि उच्च स्तरावरील सामन्यासह एलिट पॅनलमध्ये टिकून राहण्यासाठी खूप स्पर्धा आहे. तसेच मागील काही वर्षात एलिट स्थरावरीस पंचांच्या तयार केलेल्या रिपोर्ट कार्डमध्ये एस रवी हे तळाच्या स्थानावर आहेत.’
आयपीएल 2019 मध्ये नो बॉल प्रकरणात चर्चेत आले रवी –
आयपीएलच्या 12 व्या मोसमात 28 मार्चला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात झालेल्या सामन्यात नो बॉलचे प्रकरण गाजले होते. या सामन्यात मुंबईकडून लसिथ मलिंगाने टाकलेला सामन्यातील शेवटचा चेंडू नो बॉल होता.
परंतू त्या सामन्यात पंच असणाऱ्या रवी यांच्या हा नो बॉल लक्षात आला नाही. त्यामुळे बेंगलोरला या नोबॉलचा फायदा मिळाला नाही. तसेच त्यांना केवळ 6 धावांनी सामना गमवावा लागला. या सामन्यानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी पंचांच्या निर्णयावर टिका केली होती.
रवी यांना त्यांच्या निर्णयातील या चूकांचाही फटका बसला असल्याची शक्यता आहे. याबद्दल अधिकाऱ्यांनी सांगितले की ‘आयसीसीकडे पंचांच्या कामगिरीचे वार्षिक मुंल्यांकन करण्यासाठी योग्य कार्यप्रणाली आहे.’
महत्त्वाच्या बातम्या –
–धोनीने मारला एका हाताने षटकार, गोलंदाजाने बिमर टाकल्याने मागितली माफी, पहा व्हिडिओ
–काॅईन जमीनीवर फिरतोय, तरीही सीएसकेने टाॅस जिंकल्याचे रेफ्रीने केले जाहीर, पहा व्हिडिओ
–रैनाने रचला इतिहास, दिल्ली विरुद्धच्या सामन्यात केले तीन खास विक्रम