भारतीय संघाचा २०२०-२१ चा ऑस्ट्रेलिया दौरा मंगळवारी (१९ जानेवारी) संपला. या दौऱ्यात भारतीय संघाने कसोटी मालिकेत २-१ अशा फरकाने ऐतिहासिक विजय मिळवला. या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना ब्रिस्बेन येथे पार पडला होता. या सामन्यात ३ विकेट्सने विजय मिळवत भारताने ही मालिका जिंकली. विशेष म्हणजे तब्बल ३२ वर्षांनंतर ब्रिस्बेन येथे ऑस्ट्रेलिया संघाला पहिल्यांदा पराभूत करण्यात भारतीय संघ यशस्वी ठरला. यानंतर भारतीय संघाचे मोठ्या प्रमाणात कौतुक करण्यात आले. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील भारतीय संघाचे कौतुक केले आहे.
तेजपूर विद्यापीठाच्या वर्च्यूएल १८ व्या अधिवेशनात मोदींनी भारतीय संघाचे कौतुक करताना म्हटले आहे की हा आयुष्यासाठी हा मोठे धडे आहेत. ते म्हणाले, ‘क्रिकेटच्या मैदानात केलेली ही कामगिरी केवळ खेळासाठीच महत्त्वाची होती, असे नाही; तर हा आयुष्यासाठी मोठे धडेही आहे. यातील पहिला धडा म्हणजे आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा. दुसरा धडा म्हणजे, सकारात्मक दृष्टीकोन ठेवा आणि आपण जर सकारात्मक विचाराने पुढे गेलो तर त्याचे निकालही सकारात्मकच असतात.’
ते पुढे म्हणाले, ‘तिसरा महत्त्वाचा धडा म्हणजे, जर तुमच्याकडे सुरक्षित बाहेर पडण्याचा किंवा एक कठीण विजय मिळवण्याचा, असे दोन पर्याय असतील, तर तुम्ही तुम्ही नक्कीच जिंकण्याचा पर्याय निवडायला हवा. मग जरी तुम्हाला या विजेतेपदापर्यंत पोहचण्यासाठी काही पराभव स्विकारावे लागले तरी चालतील. त्याच कोणताही हानी होणार नाही. ‘
तसेच मोदी म्हणाले, ‘तुम्ही सर्वांनी भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा पाहायला पाहिजे. भारतीय संघाने अनेक समस्यांना तोंड दिले. आपण खुप वाईटरित्या हरलो. पण त्यातून पुनरागमन करत जिंकलो आणि ऐतिहासिक विजयही मिळवला.’
Honourable Prime Minister Shri @narendramodi heaps praise for #TeamIndia after a historic 2-1 Test series win in Australia.
He lauded the team’s remarkable energy, passion and grit and urged the youth to draw inspiration from the win. pic.twitter.com/fSlCbQocN5
— BCCI (@BCCI) January 22, 2021
भारताच्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेदरम्यान अनेक भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते. शेवटच्या सामन्यात तर जवळपास १ आणि २ कसोटी सामन्यांचा अनुभव असलेलेच खेळाडू संघात अधिक होते. अशा परिस्थितही युवा भारतीय संघाने अनुभवी आणि बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाला नमोहरन केले. तसेच पहिल्या सामन्यात भारतीय संघाने मानहानिकारक पराभव स्विकारला होता. पण त्यानंतर भारताने मेलबर्न येथे झालेल्या आणि ब्रिस्बेन येथे झालेला सामना जिंकला. तसेच सिडनीमध्ये झालेला सामना अनिर्णित राखला. त्यामुळे भारताला ही मालिका जिंकण्यात यश आले.
याबाबत पुढे मोदी म्हणाले, ‘जरी खेळाडू दुखापतग्रस्त झाले होते, तरी त्यांनी मैदानावर जाऊन सामना वाचवला. आव्हानात्मक परिस्थितीने त्यांचा पराभव केला नाही, उलट त्यांनी परिस्थितीचा सामना केला. काही खेळाडूंना अनुभव नव्हता, पण त्यांच्याकडे जिद्द होती. जेव्हा त्यांना संधी मिळाली तेव्हा त्यांनी इतिहास रचला. कोणीही प्रोयोग करण्यासाठी किंवा धोका पत्करण्यासाठी घाबरु नये. आपण सक्रिय आणि निर्भय असले पाहिजे.’
महत्त्वाच्या बातम्या –
कहर! वेस्ट इंडिजविरुद्ध शाकिब अल हसनचा ‘हा’ मोठा विक्रम, ठरला वनडेतील एकमेव खेळाडू
हॉटेलच्या खोलीत महिला अधिकारीसोबत सापडला युवा क्रिकेटर?, श्रीलंकाच्या माध्यमांचे आरोप
युजवेंद्र चहलबद्दल ‘ती’ टिपण्णी करणे युवराज सिंगला पडले महागात, पाहा काय आहे प्रकरण