नीरज चोप्राने पुन्हा एकदा चमत्कार करुन दाखवला आहे. त्याने अवघ्या 14 दिवसांनंतर पॅरिस ऑलिम्पिकचा विक्रम मोडला आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नीरजने 89.45 मीटर थ्रो केला होता. आता लुसेन डायमंड लीगमध्ये त्याने 89.49 मीटर भालाफेक करून त्याचा विक्रम मोडला. नीरजने लुसेन डायमंड लीगमध्ये या मोसमातील सर्वोत्तम थ्रो केला आहे.
लुसेन डायमंड लीगमध्ये आपल्या सर्वोत्तम थ्रोने नीरज लीगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिला. ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्सने 90.61 मीटर अंतरावर भालाफेक करत पहिला क्रमांक पटकावला. अँडरसन पीटर्सने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये तिसरे स्थान मिळवून कांस्यपदक जिंकले, तर नीरजने दुसरे स्थान मिळवून रौप्यपदक जिंकले.
India’s star athlete #NeerajChopra shines at the Lausanne Diamond League achieving a season-best throw of 89.49 meters. pic.twitter.com/kwh7bV6gtK
— P C Mohan (@PCMohanMP) August 23, 2024
खरे तर, लुसेन डायमंड लीगच्या शेवटच्या थ्रोमध्ये नीरजने आपल्या सर्वोत्कृष्ट कामगिरी करत दुसरा क्रमांक पटकावला. पहिल्या थ्रोमध्ये नीरजने 82.10 मीटर अंतरावर भालाफेक केली होती. यानंतर दुसऱ्या थ्रोमध्ये त्याने 83.21 मीटरचे अंतर पार केले. त्यानंतर तिसऱ्या थ्रोमध्ये तो केवळ 83.13 मीटर आणि चौथ्या थ्रोमध्ये तो केवळ 82.34 मीटर अंतर कापू शकला. यानंतर नीरजच्या पाचव्या थ्रोमध्ये थोडी सुधारणा झाली आणि त्याने 85.58 मीटर अंतर कापले. त्यानंतर सहाव्या आणि शेवटच्या थ्रोमध्ये नीरजने 89.49 मीटर अंतरावर भालाफेक करून मोसमातील सर्वोत्तम कामगिरी केली.
नीरज चोप्राला पुन्हा एकदा कारकिर्दीत 90 मीटरचा टप्पा गाठता आले नाही. नीरज अनेक दिवसांपासून 90 मीटरचा टप्पा गाठण्याचा प्रयत्न करत होता, मात्र आजतागायत त्याला यश आलेले नाही. नीरजने 2022 च्या स्टॉकहोम डायमंड लीगमध्ये त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम थ्रो केला. ज्यामध्ये त्याने 89.94 मीटर अंतर कापले. आता नीरज आपल्या कारकिर्दीत 90 मीटरचा टप्पा कधी पूर्ण करणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. वास्तविक, कंबरेच्या समस्या असूनही नीरजने लुसेन डायमंड लीगमध्ये भाग घेतला आहे.
हेही वाचा-
‘काही खास केले…’, राहुल द्रविडने 2 महिन्यांनंतर उघड केले विश्वविजेता बनण्याचे रहस्य
केएल राहुलची निवृत्तीची घोषणा? सोशल मीडिया पोस्टमुळे उडाली खळबळ
हे दोन फलंदाज ठरवतील बॉर्डर-गावस्कर मालिकेचा निकाल, मॅथ्यू हेडनचा मोठा अंदाज