---Advertisement---

“काल रात्री जेव्हा संपूर्ण देश झोपला…” भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरसाठी ‘या’ स्टार क्रिकेटरची भावूक पोस्ट

On: शुक्रवार, मे 9, 2025 5:14 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammed Siraj) भारतीय सैन्यासाठी एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सिराजने भारतीय सशस्त्र दलांबद्दल अभिमानाने लिहिले आहे की काल रात्री (8 मे) जेव्हा संपूर्ण देश फक्त तुमच्यामुळे शांत झोपला होता. तुम्हीच या मोकळ्या आकाशाखाली आमच्या जिवंत राहण्याचे कारण आहात.

भारतीय वेगवान गोलंदाजाने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवर भारतीय सैन्याच्या शौर्याबद्दल लिहिले आहे, की काल रात्री भारतीय सशस्त्र दलांनी भारतातील 15 शहरांचे रक्षण केले आहे. यासाठी सिराजने त्याच्या पोस्टमध्ये सैन्याचे आभार मानले आहेत. यासोबतच सिराजने पोस्टच्या शेवटी जय हिंद लिहिले आहे. सिराजच्या या पोस्टमध्ये भारताचा तिरंगा ध्वज दिसत आहे. तसेच, भारतीय सैन्याचे लढाऊ विमान दाखवून देशाची ताकद जाणवत आहे.

भारताचा दिग्गज क्रिकेटपटू विराट कोहलीने (Virat Kohli) भारतीय सैन्याच्या ऑपरेशन सिंदूरसाठीही पोस्ट केली आहे. विराटने त्याच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की “या कठीण काळात आपण एकत्र उभे आहोत आणि या कठीण काळात देशाचे रक्षण करणाऱ्या सशस्त्र दलांना आम्ही सलाम करतो.” कोहलीने पुढे लिहिले की “आपल्या वीरांच्या शौर्य आणि पराक्रमाचे आपण नेहमीच ऋणी राहू.” विराट कोहलीने भारताच्या वीरांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---