---Advertisement---

फलंदाजी सोडून गोलंदाजी करतोय भारताचा स्टार ‘हा’ स्टार क्रिकेटर! पहा VIDEO

On: गुरूवार, जुलै 3, 2025 6:34 PM
---Advertisement---

Ishan Kishan Bowling: भारतीय संघाचा स्टार खेळाडू ईशान किशन (Ishan Kishan) इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय कसोटी संघात सामील नाही. परंतु तो सध्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये नॉटिंगहॅमशायरकडून खेळत आहे. जिथे त्याने समरसेटविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी केली आहे, तर ईशान त्याच्या फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे आणि तो विस्फोटक फलंदाजी करतो. मात्र गेल्या काही काळापासून त्याची कामगिरी अशी नाही की त्याला भारतीय संघात प्रवेश मिळू शकेल. (Ishan Kishan international comeback)

नॉटिंगहॅमशायर आणि समरसेट यांच्यातील सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात ईशान किशनने 77 धावांची खेळी केली. तर संघासाठी बेन स्लेटरने 124 धावा आणि जॅक हेन्सने 157 धावा केल्या. पण किशन शतक झळकावू शकला नाही. विशेष म्हणजे, तो सामन्यात यष्टीरक्षक म्हणून समाविष्ट होता. तरीही त्याने एक षटक गोलंदाजी केली आणि यावेळी त्याने फक्त 1 धाव दिली. तो गोलंदाजी करताना हरभजन सिंगसारखी ॲक्शन करताना दिसला. आता त्याचा गोलंदाजी करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Ishan Kishan Harbhajan Singh action)

या सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, समरसेट संघाने प्रथम फलंदाजी करताना 379 धावा केल्या. यानंतर फलंदाजांच्या शानदार खेळाच्या जोरावर नॉटिंगहॅमशायर संघाने 509 धावांचा डोंगर उभारला. संघासाठी बेन स्लेटर आणि जॅक हेन्सने शतके झळकावली. अशा प्रकारे नॉटिंगहॅमशायर संघाने पहिल्या डावाच्या आधारावर 130 धावांची आघाडी घेतली. यानंतर समरसेट संघाने दुसऱ्या डावात 238 धावा करून डाव घोषित केला आणि सामना अनिर्णित राहिला. (Nottinghamshire vs Somerset)

ईशान किशन सध्या भारतीय संघापासून दूर आहे. त्याने भारतीय संघासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळला होता. त्यानंतर तो भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये येऊ शकला नाही. त्याने भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले आहे. भारतीय संघासाठी 2 कसोटी सामन्यांमध्ये 78 धावा, 27 वनडे सामन्यांमध्ये 933 धावा आणि 32 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 796 धावा केल्या आहेत. त्याने बांगलादेशविरुद्ध वनडे सामन्यात द्विशतकही झळकावले आहे. हे द्विशतक झळकावल्यानंतर किशनने अनेक मोठे रेकाॅर्ड्स आपल्या नावावर केले. (Double century Ishan Kishan)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---