---Advertisement---

मात्र 132 धावा दूर! भारताचा ‘हा’ स्टार फलंदाज करणार ‘विश्वविक्रम’

On: मंगळवार, सप्टेंबर 17, 2024 7:23 PM
---Advertisement---

भारत घरच्या भूमीवर बांगलादेशसोबत 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यासाठी भारतीय संघ चेन्नईच्या मैदानावर घाम गाळत आहे. भारतीय संघाची पहिल्या सामन्यासाठी घोषणा झाली आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचा युवा स्टार फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi jaiswal) इतिहास रचण्यापासून 132 धावा दूर आहे.

वर्षाच्या सुरूवातीला इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत जयस्वालने चमकदार फलंदाजी केली होती. त्याने या मालिकेत दोन द्विशतके झळकावून 700 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. जी कोणत्याही फलंदाजाची सर्वोच्च धावसंख्या होती. जयस्वाल सध्याच्या 2023-25 ​​वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) हंगामात इतिहास रचण्याच्या मार्गावर आहे. यापासून तो फक्त 132 धावा दूर आहे. तसेच बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेत तो रचू शकतो.

बांगलादेशविरूद्धच्या आगामी 2 सामन्यांच्या मालिकेत जयस्वालने 132 धावा केल्या तर तो अजिंक्य रहाणेला मागे सोडेल. जयस्वाल भारतीय कर्णधार रोहितसह, एका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या हंगामात 1,000 पेक्षा जास्त धावा करणाऱ्या तीन भारतीय खेळाडूंपैकी एक आहे. जयस्वाल 2023-25 ​​मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. तो इंग्लंडच्या बेन डकेटच्या बरोबरीला आहे. ज्याने आतापर्यंत 1,028 धावा केल्या आहेत.

भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना (19 सप्टेंबर) रोजी चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर खेळला जाणार आहे. तर दुसरा कसोटी सामना कानपूरमध्ये खेळला जाणार आहे.

बांगलादेशविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, यश दयाल

महत्त्वाच्या बातम्या-

केएल राहुलला संघात स्थान का? भारतीय कर्णधाराने केला मोठा खुलासा
भारताने 5व्यांदा कोरले चॅम्पियन्स ट्राॅफीवर नाव, फायनलमध्ये चीनला पछाडले
भारतासाठी सर्वाधिक एकदिवसीय शतके, जेव्हा इतर कोणत्याही फलंदाजाने केले नाही अर्धशतक

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---