भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ आगामी टी२० विश्वचषकानंतर संपणार आहे. शास्त्रींनंतर भारतीय संघाला प्रशिक्षकाच्या रूपात नवीन चेहरा मिळेल असा अंदाज लावला जात आहे. अशातच आता भारतीय संघाच्या आणखी एका सदस्याने संघासोबतचा प्रवास थांबवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. भारतीय संघाचे स्ट्रेंथ आणि कंडीशनिंग प्रशिक्षक निक वेब यांनी विश्वचषकानंतर त्यांचे पद सोडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांनी बीसीसीआयला याबाबत माहिती दिली आहे.
निक वेब भारतीय संघासोबत २०१९ विश्वचषक संपल्यानंतर जोडले गेले होते. यापूर्वी त्यांच्या जागेवर शंकर बासू कार्यरत होते. तसेच निक यांनी न्यूझीलंड महिला क्रिकेट संघ आणि देशांतर्गत संघासोबतही काम केले आहे. त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने चांगली कामगिरी केली आहे. त्यांच्या कार्यकाळात भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला. तसेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही भारतीय संघाने विजय मिळवला होता.
निक वेबने त्यांचे पदावरून पायउतार होण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की, “मागच्या दोन वर्षांत मला भारत बीसीसीआय आणि भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची सौभाग्य मिळाले आहे. यादरम्यन आम्ही एका संघाच्या रूपात खूप काही मिळवले आहे. आम्ही सामने हारले आणि जिंकलेही. पण सतत आव्हानांना स्वीकार करणे आणि चांगले प्रदर्शन करणे खास राहिले.”
त्यांनी सांगितले की, हा निर्णय सोपा नव्हता. पण कुटुंबाला प्राधान्य दिले पाहिजे. देशातील कोरोनाच्या प्रतिबंधांमुळे मला हा निर्णय घ्यावा लागला. त्यांनी पुढे सांगितले की, मला माहीत नाही की, भविष्य काय असेल. पण टी २० विश्वचषकात मी भारतीय संघाची संभव असेल ती सगळी मदत देऊ इच्छित आहे.
आगामी टी२० विश्वचषक १७ ऑक्टोबरपासून यूएई आणि ओमानमध्ये खेळवला जाणार आहे. भारतीय संघ विश्वचषकातील त्याच्या अभियानाला २४ ऑक्टोबरला सुरुवात करणार आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तानसोबत असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कोलकाता वि. राजस्थान सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
कोलकाता, मुंबई की पंजाब, कोण ठरणार प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ? पाहा कसे आहे समीकरण