---Advertisement---

कोलकाता वि. राजस्थान सामन्यासाठीची ‘महा ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!

On: गुरूवार, ऑक्टोबर 7, 2021 5:07 PM
---Advertisement---

गुरुवारी (७ ऑक्टोबर) आयपीएल स्पर्धेत डबल हेडर सामन्यांचा थरार पाहायला मिळणार आहे. यामध्ये दुसऱ्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. या स्पर्धेत ३ संघांनी प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. तर चौथे स्थान मिळवण्यासाठी मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या सामन्याचा निकाल तिन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे.

तत्पूर्वी, आम्ही तुमच्यासाठी या सामन्यासाठीचा सर्वोत्कृष्ट ११ खेळाडूंचा अंदाज घेऊन आलो आहोत. चला तर पाहूया, कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स सामन्यासाठीचा ड्रीम ११ संघ कसा असेल.

या सामन्याबद्दल अधिक माहिती

सामना – कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, ५४ वा सामना

दिनांक/वेळ – ७ ऑक्टोबर, २०२१, संध्याकाळी ७:३० वाजता.

ठिकाण – शारजहा क्रिकेट स्टेडियम,शारजहा

या सामन्यासाठी असा असू शकतो कोलकाता नाईट रायडर्स संघाचा संभावित ११ खेळाडूंचा संघ 

शुबमन गिल, व्यंकटेश अय्यर, राहुल त्रिपाठी, नितीश राणा, ओएन मॉर्गन (कर्णधार), शकीब अल हसन/ आंद्रे रसल, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक),टीम साउथी, शिवम मावी, वरून चक्रवर्ती आणि सुनिल नरेन.

या सामन्यासाठी असा असू शकतो राजस्थान रॉयल्सचा संघाचा संभावित ११ खेळाडूंचा संघ 

संजू सॅमसन (कर्णधार, यष्टीरक्षक), एविन लुईस, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे, ग्लेन फिलिप्स, डेविड मिलर/ लियाम लिविंगस्टन, राहुल तेवतिया, श्रेयस गोपाळ, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, चेतन सकारिया

या सामन्यात हे ११ खेळाडू असू शकतात ड्रीम ११ संघात 

यष्टिरक्षक – संजू सॅमसन

फलंदाज – एविन लुईस, ग्लेन फिलिप्स, राहुल त्रिपाठी, शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल

अष्टपैलू – सुनील नरेन, आंद्रे रसल

गोलंदाज – शिवम मावी, वरून चक्रवर्ती, चेतन सकारिया

कर्णधार – संजू सॅमसन

उप कर्णधार – सुनील नरेन

महत्त्वाच्या बातम्या – 

कोलकाता, मुंबई की पंजाब, कोण ठरणार प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा चौथा संघ? पाहा कसे आहे समीकरण

फळं-भाज्या विक्रेत्याच्या मुलाने टाकला आयपीएलमधील सर्वात वेगवान चेंडू, वाचा उमरानच्या वडिलांनी दिलेली प्रतिक्रिया

पाकिस्तान संघाचे प्रशिक्षकपद का नाकारले? वसीम अक्रम म्हणाले, ‘मी मूर्ख नाही…’

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---