आगामी टी 20 विश्वचषकामध्ये भारत विरुध्द पाकिस्तान सामना न्यूयाॅर्क येथे रंगणार आहे. हा सामना 9 जून रोजी खेळला जाणार आहे. या सामन्याबद्दल एक आश्चर्यकारक माहिती समोर येत आहे. रिपोर्टनूसार भारत आणि पाकिस्तान सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचा धोका असल्याचे समोर आले आहे. पण यासंदर्भात आतापर्यंत अधिकृतरित्या कोणतीही माहिती मिळाली नाही. रिपोर्टनूसार आईएसआईएसने धमकी दिल्याचे म्हंटले जात आहे.
भारत आणि पाकिस्तान सामन्यासाठी आधीच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त करण्यात येणार आहे. पण आता दहशतवादी हल्ल्याच्या धमकीमुळे चाहत्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. मीडिया रिपोर्टनूसार आईएसआईएस (ISIS-K) गटाने आपल्या हल्लेखोरांना भारत-पाकिस्तान सामन्यावर ‘लोन वुल्फ’ हल्ला (एक हल्लेखोर) करण्यास सांगणारा एक धमकीचा व्हिडिओ व्हायरल केला आहे यामुळे स्थानिक पोलिस प्रशासनावर अतिरिक्त दबाव आला आहे.
न्यूयॉर्कच्या गव्हर्नर कॅथी हॉचुल यांनी भारत आणि पाकिस्तान सामन्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तिने ‘X’ वर एक पोस्ट शेअर केली आणि सांगितले की, सुरक्षेबाबत अधिकाऱ्यांशी बोलले आहे आणि ते एकत्र काम करत आहेत. हॉचुलने पोस्टमध्ये लिहिले की, “माझी टीम क्रिकेट वर्ल्ड कपच्या तयारीसाठी फेडरल आणि कायदेशीर अधिकाऱ्यांसोबत जवळून काम करत आहे. सामना पाहण्यास आलेल्या लोकांच्या सुरक्षेची आम्ही पूर्ण काळजी घेऊ.
In preparation for the @cricketworldcup, my team has been working with federal & local law enforcement to keep attendees safe.
While there is no credible threat at this time, I’ve directed @nyspolice to elevate security measures & we’ll continue to monitor as the event nears.
— Governor Kathy Hochul (@GovKathyHochul) May 29, 2024
आयसीसीच्या प्रवक्त्याने सांगितले की, ‘स्पर्धेतील प्रत्येकाची सुरक्षा ही आमची पहिली जबाबदारी आहे. आणि आमच्याकडे मजबूत सुरक्षा यंत्रणा आहेत. आम्ही आमच्या यजमान देशांमधील अधिकाऱ्यांसोबत जवळून काम करतो आणि जागतिक परिस्थितीवर आमची करडी नजर असते, त्यामुळे विश्वचषकामध्ये अशी कोणतीही अनुचित प्रकार घडणार नाही. यांची स्पष्टता आयसीसी कडून करण्यात आली आहे.
महत्तवाच्या बातम्या-
बाबर आझम मोडणार का कोहलीचा विक्रम? बाबरला आज संधी, जाणून घ्या बातमीद्वारे
टी 20 विश्वचषकापूर्वी सूर्या चमकला! आयसीसीच्या “टी 20 क्रिकेटर ऑफ द ईयर” पुरस्काराने सन्मानित
टी20 विश्वचषकापूर्वी ब्रायन लारानं केली भविष्यवाणी ‘हे’ 4 संघ ठरणार सेमीफायनलसाठी पात्र