---Advertisement---

सामना हरल्यानंतरही नेपाळ संघाने जिंकले 140 कोटी भारतीयांची मने, पाहा स्मृती मंधानाला काय दिले?

On: बुधवार, जुलै 24, 2024 11:29 AM
---Advertisement---

भारतीय महिला संघ नेपाळ संघावर मात करत महिला आशिया कप 2024 स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. महिला आशिया चषक 2024 मधील 10 वा सामना भारत आणि नेपाळ यांच्यात खेळला गेला. ज्यामध्ये भारतीय संघाने 82 धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. या सामन्यादरम्यान नेपाळच्या महिला संघाची कामगिरी नक्कीच काही खास नव्हती, पण त्यांच्या या कृतीने त्यांनी भारतातील 140 कोटी लोकांची मने जिंकली आहेत.

भारत विरुद्ध नेपाळ सामन्यात भारतीय महिला संघाचे नेतृत्व करणारी स्टार सलामीवीर स्मृती मंधाना आणि नेपाळची कर्णधार इंदू बर्मा यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये इंदू मंधानाला गिफ्ट देताना दिसत आहे. ही खास भेट वस्तूमध्ये ‘गाैतम बुध्दांचा’ मूर्ती होती. विरोधी कर्णधाराकडून गिफ्ट मिळाल्यानंतर मंधानाही खूप आनंदी दिसत होती.

भारताविरुद्ध नेपाळी संघाच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर त्यांची कामगिरी काही विशेष नव्हती. भारतीय संघाने पहिल्या डावात फलंदाजी करताना 20 मध्ये 178 धावा केल्या. गोलंदाजीत नेपाळ संघाने टीम इंडियाच्या 3 विकेट्स मिळवल्या. लक्ष्याचा पाठलाग कारतााना नेपाळ संघाचा टीम इंडियाच्या गोलंदाजी समोर टिकाव लागला नाही. संपूर्ण संघ 20 षटकांत 9 गडी गमावून केवळ 96 धावा करू शकला. भारतीय संघाविरुद्ध फलंदाजी करताना नेपाळ संघाच्या खेळाडूंना 20 धावासंख्या ही पार करता आले नाही. सर्वाधिक सीता राणा मगर (18) धावा केल्या.

पहिल्या डावात भारताकडून फलंदाजी करताना सलाामीवीर शेफाली वर्मामे विस्फोटक फलंदाजी केली तिने 48 चेंडूत 81 धावा केल्या. तर हेमलथाने देखील 47 धावांची खेळी खेळली. तर सामन्यांच्या शेवटी जेमिमाह रॉड्रिग्ज आक्रमक फलंदाजी करत भारताचा स्कोअर 178 धावांवपर्यंत पोहचवण्यासाठी शानदार कामगिरी केली. तिने 15 चेंडूत 28 धावा ठोकल्या.

महत्त्वाच्या बातम्या-

‘टीम इंडिया’ या 5 खेळाडूंपासून जरा जपूनचं, नाही तर होऊ शकतो टी20 मध्ये खेळ खराब
देशद्रोहाचे आरोप! दिग्गज क्रिकेटर 19 व्या मजल्यावरून उडी मारुन संपवणार होता आयुष्य, जवळीक मित्राचा खुलासा
चॅम्पियन्स ट्रॉफीचा मोठा अहवाल; पाकिस्तानची आयसीसीकडे धाव म्हणाले, ‘कसं ही करा पण…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---