INDU19 vs AUSU19 Final : दक्षिण अफ्रिकेमध्ये अंडर 19 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यांसाठी अवघे काही तास बाकी आहेत. तर भारताला सहाव्यांदा, तर ऑस्ट्रेलियाला तिसऱ्यांदा अंडर 19 वर्ल्डकप विजेतेपदाची संधी देखील आहे. यामुळे या सामन्याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिले आहे. कारण, वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत झाली होती. हा सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. त्यामुळे कोट्यवधी भारतीय क्रीडाप्रेमींचं स्वप्न भंगलं होतं. त्यामुळे त्या पराभवाची कसर अंडर 19 वर्ल्डकप काढण्याची संधी असल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे.
ICC अंडर-19 पुरुष विश्वचषक 2024 च्या अंतिम फेरीत भारतीय संघाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. तर हा अंतिम सामना रविवारी 11 फेब्रुवारीला विल्मूर पार्क, बेनोनी येथे खेळवला जाणार आहे. तर भारताने पहिल्या सेमीफायनलमध्ये साउथ अफ्रिकेचा पराभव करत अंतिम सामन्यात स्थान मिळवले होते. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 1 विकेटने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता.
अशातच बघितले तर वर्षभरात तिसऱ्यांदा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम सामना होणार आहे. याआधी यापूर्वीच्या दोन सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच, 7-11 जून दरम्यान लंडनमधील ‘द ओव्हल’ येथे WTC फायनलमध्ये देखील टीम इंडियाचा सामना ऑस्ट्रेलियाशी झाला होता. तर त्या सामन्यात भारतीय संघाचा 209 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.
आता भारताच्या युवा संघाला विश्वचषक फायनलमध्ये रोहित ब्रिगेडकडून ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची चांगली संधी आहे. तर अवघ्या 84 दिवसांनी रोहितचा, कोहलीचा, शमीचा, राहुलचा, सगळ्यांचा उदय बदला घेईल, असा डायलॉग भारतीय चाहते नक्कीच म्हणत आहेत.
दरम्यान, अंडर-19 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलिया आतापर्यंत दोनदा आमने सामने आले आहेत. तर, दोन्ही वेळा भारतीय संघाने चांगल्या पद्धतीने विजय देखील मिळवला आहे. मात्र आता तिसऱ्यांदा फायनलमध्ये दोन्ही संघांमध्ये टक्कर होणार आहे. तर भारतीय संघाने इंग्लंडचा पराभव करून गेल्या विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले होते.
दोन्ही संघाचे खेळाडू
भारत अंडर 19 :- आदर्श सिंग, अर्शिन कुलकर्णी, मुशीर खान, उदय सहारन (कर्णधार), प्रियांशू मोलिया, सचिन धस, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, राज लिंबानी, नमन तिवारी आणि सौम्य पांडे.
ऑस्ट्रेलिया अंडर 19 :- हॅरी डिक्सन, सॅम कोन्स्टास, ह्यू वेबगेन (कर्णधार), हरजस सिंग, रायन हिक्स (विकेटकीपर), टॉम कॅम्पबेल, ऑलिव्हर पीक, राफ मॅकमिलन, टॉम स्ट्रेकर, महली बियर्डमन आणि कॅलम विडलर.
महत्वाच्या बातम्या –
नेतृत्वाबाबत स्वतः एमएस धोनीकडून मिळाले मार्गदर्शन, रोहितसह सर्वच कर्णधारांच्या फायद्याची माहिती