इंदोर येथे सुरू असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ समाप्त झाला. ऑस्ट्रेलियन संघाने दुसऱ्या डावात भारतीय संघाला रोखत विजयाच्या दिशेने मार्गक्रमण केले आहे. पहिल्या डावात मिळालेल्या 88 धावांच्या आघाडीनंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात कसून गोलंदाजी केली. अनुभवी फिरकीपटू नॅथन लायन याने 8 बळी मिळवत भारताचा दुसरा डाव 163 धावांवर संपवला. आता तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघासमोर विजयासाठी 76 धावांचे आव्हान असेल.
Stumps on day two 🏏
Nathan Lyon ran through India's batting lineup and registered a brilliant eight-wicket haul 👌#WTC23 | #INDvAUS | 📝: https://t.co/FFaPxt9fIY pic.twitter.com/PCAUqw8HVS
— ICC (@ICC) March 2, 2023
पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाने भारताचा डाव केवळ 109 धावांवर गुंडाळला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाखेर 4 गडी गमावत 46 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती. दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा मोठी आघाडी घेण्याचा मनसुबा रविचंद्र अश्विन व उमेश यादव यांनी हाणून पाडला. दोघांनी प्रत्येकी तीन बळी मिळवत ऑस्ट्रेलियाचा डाव 197 धावांवर संपवला. तत्पूर्वी, पहिल्या दिवशी रवींद्र जडेजा आणि ऑस्ट्रेलियाचे सर्व चार फलंदाज बाद केले होते.
ऑस्ट्रेलियाला पहिला डावात 88 धावांची आघाडी मिळाल्यानंतर भारतीय संघाला ही आघाडी भरून काढत मोठी आघाडी मिळवावी लागणार होती. मात्र, ऑस्ट्रेलियाचा सर्वात अनुभवी फिरकीपटू नॅथन लायन याने भारतीय फलंदाजांना जखडून ठेवले. भारताचे प्रमुख चार फलंदाज 78 धावांवर तंबूत परतले होते. तर एका बाजूने चेतेश्वर पुजारा संघर्ष करताना दिसत होता. चहापानानंतर श्रेयस अय्यरने आक्रमण करत 27 चेंडूवर 26 धावा केल्या. मात्र, तो बाद झाल्यानंतर भरत हा देखील लगोलग तंबूत परतला. अश्विनने 16 धावांचे योगदान दिले. त्याचवेळी पुजारा 59 धावांचे योगदान देत माघारी परतला. दिवसाचा खेळ संपला तरी भारताचा अखेरचा घडी शिल्लक असल्याने खेळ अर्धा तास जादा खेळवला गेला. अखेर लायनने सिराजला बाद करत भारताचा डाव 163 वर संपवला. त्याने एकट्याने आठ फलंदाज बाद केले. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 76 धावांचे आव्हान असेल.
(INDvAUS Indore Test Day 2 Australia In Commonding Position After Lyon Bowling Pujara Fights)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘मी कर्णधार असतो, तर त्याच्यासाठी…’, फ्लॉप ठरत असलेल्या राहुलला मिळाला आणखी एका दिग्गजाचा पाठिंबा
वडिलांना गमावल्यानंतर खचला नाही उमेश, पुनरागमन करताच गाठली बळींची ‘शंभरी’, आता लक्ष्य नव्या रेकॉर्डवर