Tuesday, March 21, 2023
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘मी कर्णधार असतो, तर त्याच्यासाठी…’, फ्लॉप ठरत असलेल्या राहुलला मिळाला आणखी एका दिग्गजाचा पाठिंबा

'मी कर्णधार असतो, तर त्याच्यासाठी...', फ्लॉप ठरत असलेल्या राहुलला मिळाला आणखी एका दिग्गजाचा पाठिंबा

March 2, 2023
in क्रिकेट, टॉप बातम्या
Team-India

Photo Courtesy: bcci.tv


भारतीय संघाचा स्टार खेळाडू केएल राहुल सातत्याने फ्लॉप होत आहे. तो भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 4 सामन्यांच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2023 कसोटी मालिकेत संघाचा भाग आहे. पहिले दोन्ही सामने भारताने जिंकले होते. या सामन्यांत तो ताफ्यात सामील होता. मात्र, खराब फॉर्मचा सामना करत असलेल्या राहुलला उपकर्णधारपदावरून हटवल्यानंतर तिसऱ्या कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमधूनही बाहेर केले. त्याला जोरदार टीकांचा सामना करावा लागला आहे. मात्र, त्याला संघ व्यवस्थापनाकडून भरपूर पाठिंबा मिळाला. अशात त्याला पाठिंबा देण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधारही धावला आहे.

केएल राहुल (KL Rahul) हा मागील 8 कसोटी सामन्यात एकदाही अर्धशतक झळकावू शकला नव्हता. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याचा फ्लॉप शो सुरूच होता. चाहत्यांसोबतच काही माजी दिग्गजही त्याला संघाबाहेर काढण्याची मागणी करत होते. अशात समालोचक आकाश चोप्रा (Aakash Chopra) याचा त्याला पाठिंबा मिळाला. आकाश आणि वेंकटेश प्रसाद (Venkatesh Prasad) यांच्यात राहुलवरून बाचाबाची झाली होती. आता राहुलला पाठिंबा देण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क (Michael Clarke) समोर आला आहे. राहुलला संघाबाहेर काढण्याचा निर्णय त्याच्या गळ्याखाली उतरला नाहीये. त्याने सांगितले आहे की, प्रतिभावान खेळाडू आहे. त्याच्या उपस्थितीत संघाचे नुकसान होत नव्हते.

‘मी त्याच्यासाठी लढलो असतो’
मायकल क्लार्क याने माध्यमांशी बोलताना म्हटले की, “मला वास्तवात केएल राहुल आवडतो. तो एक महान युवा आणि एक शानदार प्रतिभावान खेळाडू आहे. भारत सध्या जिंकत आहे, त्यामुळे मी कर्णधार असतो, तर त्याच्यासाठी लढत राहिलो असतो. माझा विचार असता की, आम्ही जिंकत आहोत. मला माहितीये की, तो त्याच्या सर्वोत्तम स्थितीत नाहीये, परंतु आपण त्याला आता संघात खेळवण्याची जोखीम उचलू शकतो. तो एक चांगला खेळाडू आहे. तो खूपच कठीण प्रशिक्षण घेईल आणि आपल्यासाठी पुनरागमन करणार आहे.”

“जर संघ जिंकत आहे, तर मला वाटते की, त्याला ते त्या खेळाडूंना आणखी वेळ संघात ठेवू शकले असते, जे चांगली कामगिरी करू शकत नाहीयेत. त्यामुळे मी केएल राहुलसाठी लढेल,” असेही पुढे बोलताना क्लार्क म्हणाला.

भारतीय संघाची स्थिती
भारतीय संघाने 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. तसेच, मालिकेत 2-0ने आघाडी घेतली आहे. सध्या तिसरा कसोटी सामना इंदोरमध्ये सुरू आहे. यामध्ये भारतीय संघाचा दुसरा डाव सुरू आहे. भारत 32 षटकांनंतर 4 विकेट्स गमावत 79 धावांवर खेळत आहे. चेतेश्वर पुजारा 36 आणि श्रेयस अय्यर शून्य धावेवर नाबाद आहेत. (after akash chopra former cricketer michael clarke came out in support of kl rahul read here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वडिलांना गमावल्यानंतर खचला नाही उमेश, पुनरागमन करताच गाठली बळींची ‘शंभरी’, आता लक्ष्य नव्या रेकॉर्डवर
कसोटीत नवा जगज्जेता बनण्याच्या दिशेने अश्विनची वाटचाल, कपिल पाजींच्या ‘तो’ विक्रमही काढला मोडीत


Next Post
Nathan Lyon

ऑस्ट्रेलियाच्या 'सिंहा'चा भारताविरुद्ध इतिहास! मुरलीधरनचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडत बनला यशस्वी फिरकीपटू

ricky-ponting

काट्याच्या इंदोर कसोटीपेक्षा पॉंटिंगला सतावतेय दुसरीच चिंता, म्हणाला, "आता त्याचं कसं होणार?"

Photo Courtesy: Twitter

पुन्हा रंगणार गंभीर-आफ्रिदीचे महायुद्ध! लिजेंड्स लीगमध्ये कर्णधार म्हणून समोरासमोर उभे ठाकणार

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143