---Advertisement---

WTC फायनलसाठी पंचांची घोषणा! टीम इंडियासाठी ‘अनलकी’ ठरलेले पंचही सामील

---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023 चा अंतिम सामना 7 जून रोजी खेळला जाणार आहे. लंडन येथील ओव्हल मैदानावर ही प्रतिष्ठेची लढत खेळली जाईल. आता या महत्त्वाच्या लढतीसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पंचांची घोषणा केली. यामध्ये दोन मैदानी पंच, तिसरे पंच व चौथ्या पंचांचा समावेश आहे. मात्र, सामनाधिकाऱ्याच्या नावाची घोषणा झालेली नाही.

https://twitter.com/ICC/status/1663123719466676245?t=e9VdyN0oVo4bLaxlv38ffA&s=19

दोन वर्षाच्या सायकलनंतर गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर राहिलेला भारत व द्वितीय क्रमांकावरील ऑस्ट्रेलिया हे या लढतीत आमने-सामने येथील. यापूर्वी झालेल्या पहिल्या सायकलमध्ये भारतीय संघाला अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभूत व्हावे लागले होते. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ विजेतेपदाची अपेक्षा बाळगून आहे. तर दुसरीकडे पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच अंतिम फेरी खेळताना मानाची गदा उंचावू इच्छिते.

आयसीसीने जाहीर केल्याप्रमाणे या सामन्यात मैदानी पंच म्हणून न्यूझीलंडचे ख्रिस गॅफनी व इंग्लंडचे रिचर्ड इलिंगवर्थ हे काम पाहतील. पंचांच्या भूमिकेत इंग्लंडचेच रिचर्ड केटलबरो दिसणार आहेत. तर चौथे पंच म्हणून श्रीलंकेचे कुमार धर्मसेना हे उपलब्ध असतील. या अंतिम सामन्याचे सामनाधिकारी म्हणून इंग्लंडच्या ख्रिस ब्रॉड यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबतची कोणतीही अधिकृत घोषणा केली गेली नाही. यातील केटलबरो ज्यावेळी मैदानावर अथवा तिसरे पंच म्हणून काम पाहतात त्यावेळी भारतीय संघ आयसीसीच्या महत्त्वाच्या सामन्यांमध्ये पराभूत झाला आहे.

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपसाठी उभय संघ-

ऑस्ट्रेलियाचा संघ: पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, ऍलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, टॉड मर्फी, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर

स्टँडबाय खेळाडू: मिच मार्श, मॅथ्यू रेनशॉ

भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (यष्टीरक्षक)

स्टँडबाय खेळाडू : यशस्वी जयस्वाल, मुकेश कुमार, सूर्यकुमार यादव

(INDvAUS Officials Announced For WTC Finals  Ellingworth Kettlebrough There)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्याने काय आयुष्यभर खेळावं…?’, धोनीच्या IPL निवृत्तीवर स्पष्टच बोलले कपिल देव
मोठी बातमी! IPL फायनलपूर्वी समजली गिलची सर्वात मोठी कमजोरी, भारताच्या माजी दिग्गजाचा खुलासा

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---