---Advertisement---

पुणे वनडे ठरणार ‘या’ खेळाडूचा शेवटचा सामना? खराब फॉर्ममुळे वनडे करियर आलंय धोक्यात

On: शनिवार, मार्च 27, 2021 4:47 PM
---Advertisement---

इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय क्रिकेट संघाचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव चांगलाच महागडा ठरत आहे. शुक्रवारी(२६ मार्च) पुण्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात त्याने आपल्या वनडे कारकिर्दीतील सर्वात खराब गोलंदाजी केली. त्याला कसोटी संघात स्थान मिळात नाही. तसेच, तो टी२० संघाबाहेर आहे. अशा परिस्थितीत हा सामना त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरू शकतो.

दोन्ही सामन्यात महागडा ठरला कुलदीप

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात महागडा ठरलेल्या कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर दुसऱ्या सामन्यात जोरदार फटकेबाजी झाली. प्रथम फलंदाजी करताना भारताने ३३६ धावा केल्या होत्या, परंतु भारतीय गोलंदाज त्याचा बचाव करू शकले नाहीत. कुलदीपने एकट्याने ८४ धावा दिल्या. त्यामुळे त्याला पुन्हा भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता मावळली आहे.

पहिल्या वनडे सामन्यात कुलदीपने ९ षटकांत ६८ धावा दिलेल्या. त्याला इंग्लिश फलंदाजांनी ४ षटकार आणि ५ चौकार लगावले होते. दुसर्‍या सामन्यात त्याची परिस्थिती आणखीच खराब होती. त्याच्या गोलंदाजीवर ८ षटकार आणि ३ चौकार इंग्लंडच्या फलंदाजांनी मारले होते. पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यातही तो बळी मिळविण्यात अपयशी ठरला.

दुसर्‍या वनडे सामन्यात इंग्लंडविरुद्ध कुलदीपची गोलंदाजीची कामगिरी ही त्याच्या कारकिर्दीतील सर्वात महागडी कामगिरी आहे. यापूर्वी त्याने गेल्या वर्षी न्यूझीलंडविरुद्ध १० षटकांत ८४ धावा दिल्या होत्या. या सामन्यात त्याने दोन बळी मिळवलेले. मात्र, शुक्रवारच्या सामन्यात त्याने पूर्ण १० षटके टाकली नाहीत आणि तो एक बळीही मिळवू शकला नाही.

मोठ्या स्पर्धेला सामोरा जात आहे कुलदीप
अश्विन आणि रवींद्र जडेजा असल्याने कुलदीप कसोटी क्रिकेटमधील प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवू शकत नाही. भारतीय कर्णधार विराट कोहलीचा कुलदीपवरील विश्वास कमी झाला असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. सध्या भारताच्या मर्यादित षटकांच्या संघात वाशिंग्टन सुंदर, राहुल चहर व अक्षर पटेल यासारख्या फिरकीपटूंचा समावेश असल्याने कुलदीपसाठी पुढील रस्ता कठीण बनला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Video: मुंबई इंडियन्स फॅन्स, तुमच्या आवडत्या संघाची नवी जर्सी पाहिली का?

विराटने ४ वर्षांपूर्वी त्याला ‘किंग कोहली’ का म्हणतात याच प्रात्यक्षिक दिलं होतं, पाहा व्हिडिओ

मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरला २७ वर्षांपुर्वी ‘या’ खेळाडूने केले होते ओपनर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---