---Advertisement---

INDvENG: भारताला विजयी आघाडी घेण्याची संधी, तर इंग्लंडसाठी ‘करो या मरो’ची स्थिती, दुसऱ्या वनडेबद्दल जाणून घ्या सर्वकाही

On: गुरूवार, मार्च 25, 2021 9:02 PM
---Advertisement---

पुणे। भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी आणि टी२० मालिकेनंतर आता वनडे मालिका सुरु आहे. या वनडे मालिकेतील दुसरा सामना शुक्रवारी (२६ मार्च) होणार आहे. हा सामन्यात विजय मिळवून मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी आहे. तर इंग्लंड संघासाठी मात्र, ‘करा वा मरा’ अशा स्थितीतील सामना असणार आहे.

मालिकेतील स्थिती

भारत आणि इंग्लंड संघातील ३ सामन्यांची वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ६६ धावांनी विजय मिळवला. या विजयासह मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यात जर भारतीय संघाने विजय मिळवला तर भारतीय संघ ही मालिकाही खिशात खालेल. मात्र, जर इंग्लंडने हा सामना जिंकला तर मालिकेत १-१ अशी बरोबरी होईल आणि तिसरा सामना निर्णायक ठरेल.

आमने-सामने

भारत आणि इंग्लंड संघात आत्तापर्यंत १०१ वनडे सामने खेळवण्यात आले आहेत. यातील ५४ सामने भारताने जिंकले आहेत. तसेच इंग्लंडने ४२ सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर २ सामने बरोबरीत सुटले असून ३ सामन्यांचा निकाल लागलेला नाही. या १०१ सामन्यांपैकी ४९ सामने भारतात झाले आहेत. त्यातील ३२ सामने भारताने तर १६ सामने इंग्लंडने जिंकले आहेत.

भारत-इंग्लंडच्या ११ जणांच्या संघात बदल होणे निश्चित

दुसऱ्या वनडे सामन्यासाठी भारताच्या ११ जणांच्या संघात बदल होणे निश्चित आहे. भारताचा मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर पहिल्या वनडेदरम्यान क्षेत्ररक्षण करताना दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो उर्वरित वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. अय्यर ऐवजी शुबमन गिल किंवा सुर्यकुमार यादव यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. तसेच पहिल्या वनडेदरम्यान रोहित शर्मा देखील फलंदाजीदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे दुसऱ्या वनडेत त्याच्या खेळण्यावरही प्रश्नचिन्ह आहे.

केवळ भारतालाच नाही तर इंग्लंड संघालाही दुखापतीमुळे धक्के बसले आहेत. पहिल्या वनडेदरम्यान सॅम बिलिंग्स आणि इंग्लंडचा कर्णधार ओएन मॉर्गन दुखापतग्रस्त झाले होते. त्यामुळे मॉर्गन उर्वरित वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. तर बिलिंग्स देखील दुसऱ्या सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे आता उर्वरित मालिकेत जोस बटलर इंग्लंड संघाचे नेतृत्व करणार आहे. तर लियाम लिविंगस्टोन दुसऱ्या सामन्यातून वनडे पदार्पण करणार असल्याचे इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे.

कधी, कुठे आणि केव्हा होणार भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा वनडे सामना घ्या जाणून –

१. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दुसरा सामना केव्हा होणार?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दुसरा वनडे सामना २६ मार्च रोजी खेळला जाणार आहे.

२. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दुसरा वनडे सामना कुठे खेळवला जाणार ?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दुसरा वनडे सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, गहुंजे, पुणे येथे खेळवला जाईल.

३. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दुसरा वनडे सामना किती वाजता सुरु होणार ?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दुसरा वनडे सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरु होईल. त्याआधी दुपारी १.०० वाजता नाणेफेक होईल.

४. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दुसऱ्या वनडे सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल ?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दुसऱ्या वनडे सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.

५. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दुसऱ्या वनडे सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल ?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील दुसऱ्या वनडे सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन हॉटस्टारवर पाहाता येईल.

यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ – 

भारतीय संघ – 

रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, शार्दुल ठाकुर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल, टी नटराजन, रिषभ पंत(यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज , वॉशिंग्टन सुंदर, शुबमन गिल

इंग्लंड संघ – 

जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, मोईन अली, सॅम करन, टॉम करन, आदिल रशीद, मार्क वूड, रीस टोपली, लियाम लिव्हिंगस्टोन, मॅथ्यू पार्किन्सन, डेव्हिड मलान

महत्त्वाच्या बातम्या –

कोहली किंवा धोनी नाही तर ‘हा’ आहे भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू

चेन्नई संघासाठी आनंदाची बातमी! जडेजा शस्त्रक्रियेनंतर मैदान गाजवण्यास सज्ज

“आता राजकारणाच्या मैदानातही मिळावी गांगुलीची साथ”, भारताच्या माजी खेळाडूने दर्शवली इच्छा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---