---Advertisement---

INDvENG: मालिका विजयासाठी दोन्ही संघांमध्ये चूरस; कुठे व केव्हा होणार तिसरा वनडे, जाणून घ्या सर्वकाही

On: रविवार, मार्च 28, 2021 12:06 AM
Jos Buttler and Virat Kohli
---Advertisement---

पुणे। भारत विरुद्ध इंग्लंड संघात कसोटी आणि टी२० मालिकेनंतर आता वनडे मालिका सुरु आहे. या वनडे मालिकेतील तिसरा आणि अंतिम सामना रविवारी (२८ मार्च) होणार आहे. हा सामन्यात विजय मिळवून मालिकेत विजय मिळवण्याची दोन्ही संघांना संधी आहे. त्यामुळे हा निर्णायक सामना असणार आहे.

मालिकेतील स्थिती

भारत आणि इंग्लंड संघातील ३ सामन्यांची वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ६६ धावांनी विजय मिळवला. या विजयासह मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर इंग्लंडने दुसरा सामना ६ विकेट्सने जिंकला. त्यामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली. यामुळे आता तिसरा वनडे सामना निर्णयक सामना असणार आहे.

आमने-सामने

भारत आणि इंग्लंड संघात आत्तापर्यंत १०२ वनडे सामने खेळवण्यात आले आहेत. यातील ५४ सामने भारताने जिंकले आहेत. तसेच इंग्लंडने ४३ सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर २ सामने बरोबरीत सुटले असून ३ सामन्यांचा निकाल लागलेला नाही. या १०२ सामन्यांपैकी ५० सामने भारतात झाले आहेत. त्यातील ३२ सामने भारताने तर १७ सामने इंग्लंडने जिंकले आहेत.

भारतच्या ११ जणांच्या संघात बदल होण्याची शक्यता 

तिसऱ्या वनडे सामन्यासाठी भारतीय संघव्यवस्थापन ११ जणांच्या संघात १ बदल करु शकतात. गेल्या दोन वनडे सामन्यात कुलदीप यादवने सर्वांना निराश केले आहे. अशा परिस्थितीत अखेरच्या निर्णायक सामन्यात कर्णधार विराट कोहली युजवेंद्र चहलला संधी मिळण्याची शक्यता आहे.

तसेच इंग्लंडचा संघ मात्र, अंतिम ११ जणांच्या संघात बदल करण्याची शक्यता कमी आहे. ते दुसऱ्या सामन्यात खेळवलेला ११ जणांचा संघच अंतिम सामन्यासाठीही कायम करु शकतात.

कधी, कुठे आणि केव्हा होणार भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा वनडे सामना घ्या जाणून –

१. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील तिसरा सामना केव्हा होणार?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील तिसरा वनडे सामना २८ मार्च रोजी खेळला जाणार आहे.

२. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील तिसरा वनडे सामना कुठे खेळवला जाणार ?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील तिसरा वनडे सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, गहुंजे, पुणे येथे खेळवला जाईल.

३. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील तिसरा वनडे सामना किती वाजता सुरु होणार ?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील तिसरा वनडे सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १.३० वाजता सुरु होईल. त्याआधी दुपारी १.०० वाजता नाणेफेक होईल.

४. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील तिसऱ्या वनडे सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल ?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील तिसऱ्या वनडे सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.

५. भारत विरुद्ध इंग्लंड संघातील तिसऱ्या वनडे सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल ?
– भारत विरुद्ध इंग्लंड संघातील तिसऱ्या वनडे सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन हॉटस्टारवर पाहाता येईल.

यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ – 

भारतीय संघ – 

रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या, शार्दुल ठाकुर, भुवनेश्वर कुमार, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, युजवेंद्र चहल, टी नटराजन, रिषभ पंत(यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज , वॉशिंग्टन सुंदर, शुबमन गिल.

इंग्लंड संघ – 

जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर (कर्णधार आणि यष्टीरक्षक), बेन स्टोक्स, मोईन अली, सॅम करन, टॉम करन, आदिल रशीद, मार्क वूड, रीस टोपली, लियाम लिव्हिंगस्टोन, मॅथ्यू पार्किन्सन, डेव्हिड मलान.

महत्त्वाच्या बातम्या –

बीसीसीआयचा ‘सॉफ्ट सिग्नल’ आयपीएलमधून हटवला; ‘या’ नियमांमध्येही झाले बदल

सचिन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर पीटरसनने मारला टोमणा, युवराजने दिले ‘असे’ उत्तर

सचिनपाठोपाठ दोन वेळचा विश्वविजेत्या भारतीय क्रिकेटपटूला कोरोनाची लागण, सोशल मीडियावर दिली माहिती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---