---Advertisement---

INDvENG: टी२० क्रिकेटमधील ‘या’ विक्रमांत आगेकूच करण्यासाठी विराट-रोहितमध्ये चढाओढ

On: मंगळवार, मार्च 16, 2021 3:10 PM
---Advertisement---

कसोटी मालिकेचा टप्पा पार केल्यानंतर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबाद येथे टी२० मालिका चालू आहे. या मालिकेतील पहिला टी२० सामना इंग्लंडने ८ विकेट्सने जिंकला. तर मागील पराभवाचा वचपा काढत भारताने दुसऱ्या टी२०  सामन्यात ७ विकेट्सने विजय मिळवला.

दरम्यान विराट कोहलीने टी२० क्रिकेटमधील मोठे विक्रम आपल्या नावे केले आहेत. तर संघाबाहेर असलेल्या रोहित शर्माचीही काही विक्रमांवर नजर आहे. अशात रोहितला येत्या टी२० सामन्यात संधी मिळाल्यानंतर त्या दोघांमध्ये काही विक्रमांत वरचढ ठरण्यासाठी चढाओढ रंगलेली पाहायला मिळेल.

कोहली ठरला टी२०त ३००० धावा करणारा पहिला फलंदाज
भारतीय संघाचा कर्णधार विराटला पहिल्या टी२० सामन्यात खास कामगिरी करता आली नाही. परंतु त्याने दुसऱ्या सामन्यात नाबाद ७३ धावांची ताबडतोब खेळी करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला. यासह विराटने टी२० क्रिकेटमधील ३००० धावांचा आकडा पार केला आहे. त्याने अवघ्या ८६ टी२० सामन्यात किर्तीमान केला आहे. हा विक्रम करणारा जगातील पहिलाच क्रिकेटपटू आहे.

त्याच्यानंतर मार्टिन गप्टिल ९९ टी२० सामन्यात २८३९ धावा करत दुसऱ्या स्थानावर आहे. तर रोहित १०८ सामन्यात १७७३ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

रोहित १०० पेक्षा जास्त सामने खेळणारा एकमेव भारतीय
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा रोहित एकमेव भारतीय क्रिकेटपटू आहे. त्याने २००७ ते २०२० पर्यंत सर्वाधिक १०८ सामने खेळले आहेत. त्याच्यानंतर माजी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीचा दुसरा क्रमांक लागतो. त्याने एकूण ९८ सामने खेळले आहेत. तर विराट ८७ सामन्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

कोहली शतकापासून वंचित, रोहितची सर्वोच्च खेळी १८८ धावा
टी२० क्रिकेटमध्ये निर्धारित २० षटके असल्याने शतक झळकावणे ही खूप मोठी गोष्ट असते. रोहितने या स्वरुपात एक-दोन तर ४ शतके ठोकली आहेत. तो टी२०त सर्वाधिक शतके करणारा जगातील पहिला फलंदाज आहे. मात्र विराटला अजून एकदाही शतक करता आले नाही. त्याची सर्वोच्च खेळी नाबाद ९४ धावा आहे, जी त्याने ६ डिसेंबर २०१९ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध केली होती. तर रोहितची सर्वोच्च धावसंख्या ११८ आहे. २२ डिसेंबर २०१७ रोजी श्रीलंकाविरुद्ध त्याने हा पराक्रम केला होता.

अर्धशतकांमध्ये विराट-रोहित होत असतात पुढे-मागे
सर्वाधिक अर्धशतके करण्याच्या किर्तीमानाविषयी बोलायचे झाले, विराट आणि रोहित सतत एकमेकांच्या पुढे-मागे होत असतात. सध्या विराट सर्वाधिक २६ अर्धशतकांसह अव्वलस्थानी विराजमान आहे. तर रोहित २५ अर्धशतकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या दोघांव्यतिरिक्त टी२० क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजांला २० पेक्षा जास्त अर्धशतके करता आली नाहीत.

सर्वाधिक झेलच्या विक्रमात विराट रोहितच्या पुढे
आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये विराटने आतापर्यंत ४२ झेल पकडले आहेत. तो भारताकडून या स्वरुपात सर्वाधिक झेल पकडणारा खेळाडू आहे. रोहित विराटपेक्षा फक्त दोनच्या फरकाने मागे आहे. त्याने आतापर्यंत ४० झेल पकडले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

मै तेरा, मै तेरा..! लग्नानंतर बुमराह-संजनाचा जुना व्हिडिओ व्हायरल, लाजताना दिसतोय जस्सी

वहिनी आल्या, तेही लाडक्या परीला घेऊन! अनुष्का-वामिका दिसणार तिसऱ्या टी२० सामन्यात

भारतीय संघाकडून पदार्पणासाठी उत्सुक आहे सेहवागचा भाचा, अशी राहिली आहे देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---