---Advertisement---

मै तेरा, मै तेरा..! लग्नानंतर बुमराह-संजनाचा जुना व्हिडिओ व्हायरल, लाजताना दिसतोय जस्सी

On: मंगळवार, मार्च 16, 2021 2:02 PM
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह नुकताच बोहल्यावर चढला आहे. त्याने सोमवारी (१५ मार्च) स्पोर्ट्स अँकर संजना गणेशन हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. बुमराहने सोशल मीडियाद्वारे त्याच्या लग्नाची माहिती सर्वांना दिली आहे. यानंतर बुमराह आणि संजनाचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

बीसीसीआयने २०२० मध्ये आयोजित केलेल्या एका पुरस्कार सोहळ्यातील हा व्हिडिओ आहे. बुमराहला त्यावेळी २ मोठे पुरस्कार मिळाले होते. त्यामुळे संजना अँकरच्या भूमिकेत बुमराहला पुरस्कार जिंकल्यानंतरचा त्याचा अनुभव विचारत होती. यावेळी बुमराह लाजून तिच्या प्रश्नांची उत्तरे देताना दिसत आहे. अनेकांनी या व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये हिंदी चित्रपटातील ‘मै तेरा’ हे गाणे जोडले आहे.

सोशल मीडियाद्वारे दिली लग्नाची बातमी

बुमराहने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. फोटोंच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की, ‘प्रेम जर योग्य असेल, तर आपल्याला ते योग्य मार्ग दाखवते. आजपासून मी आणि संजनाने एकमेकांसोबत नवा प्रवास सुरू केला आहे. हा आमच्या जिवनातील सर्वात आनंदी दिवस आहे. आमच्या लग्नाची बातमी तुम्हा सर्वांना कळवण्यात मला आम्हाला खूप आनंद होत आहे.’

https://www.instagram.com/p/CMb2BtxHjgD/?utm_source=ig_web_button_share_sheet

 

लग्नाच्या कारणास्तव घेतली इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतून माघार

जसप्रीत बुमराहने भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्यातून वैयक्तिक कारणास्तव माघार घेतली होती. त्यानंतर खरे कारण समोर आले होते की, त्याने विवाहपूर्व तयारीसाठी मालिकेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला होता. बुमराहच्या अनुपस्थित संघात दुसऱ्या गोलंदाजाला संधी देण्यात आली नव्हती.

कोण आहे संजना गणेशन?

जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन ही एक मॉडेल आणि स्पोर्ट्स अँकर आहे. तसेच ती आयपीएल स्पर्धेत प्रेसेंटर म्हणुन कार्यरत आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल २०२१ च्या लिलावात देखील ती होस्ट म्हणून पाहायला मिळाली होती. क्रिकेटव्यतिरिक्त ती बॅडमिंटन आणि फुटबॉल स्पर्धेत अँकर म्हणून दिसून येते.

महत्त्वाच्या बातम्या-

ब्रेकिंग! जसप्रीत बुमराह चढला बोहल्यावर, लग्नातील फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

जसप्रीत बुमराहची पत्नी संजनाचे पुणे कनेक्शन माहित आहे काय? पुण्यातील ‘या’ महाविद्यालयातून घेतलेय शिक्षण

वहिनी आल्या, तेही लाडक्या परीला घेऊन! अनुष्का-वामिका दिसणार तिसऱ्या टी२० सामन्यात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---