ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकाचा (T20 World Cup) दुसरा उपांत्य सामना गुरूवारी (10 नोव्हेंबर)भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना ऍडलेडच्या ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यात जो जिंकेल तो 13 नोव्हेंबरला पाकिस्तानशी मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर दोन हात करणार आहे. उपांत्य फेरीच्या सामन्याची सुरूवात भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी एक वाजून तीस मिनिटांनी होणार आहे. या सामन्यात भारताला विराट कोहली, सूर्यकुमार यादव यांच्यासोबत आणखी एका खेळाडूकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
क्रिकेटमध्ये म्हटले जाते की फलंदाजीने सामने बनवले जातात, तर गोलंदाजीने सामना जिंकला जातो. विराट कोहली (Virat Kohli) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) यांच्या तुफानी फलंदाजीबरोबर भारताला अचूक गोलंदाजीचीही आवश्यकता आहे. त्याचीच उणीव भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) याने भरून काढली आहे. त्याने याचवर्षी भारताच्या टी20 संघात पदार्पण केले.
पहिल्यांदाच टी20 विश्वचषक खेळताना या डाव्या हाताच्या गोलंदाजांने या स्पर्धेतील पहिल्या सामन्यातच पाकिस्ताविरुद्ध उत्तम कामगिरी करत त्याच्यातील प्रतिभेची जाणीव चाहत्यांना करून दिली. या सामन्यात त्याने 32 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. पुढच्याही सामन्यांमध्ये त्याने उत्तम कामगिरी केली. यामुळे इंग्लंड विरुद्धच्या सामन्यातही त्याच्याकडून अशाच उत्तम कामगिरीची अपेक्षा चाहत्यांबरोबरच संघाला देखील आहे.
अर्शदीपकडे पॉवरप्लेमध्ये विकेट काढण्याचे कौशल्य आहे. खेळपट्टीवर ज्याप्रकारे त्याचा चेंडू टप्पा खात पुढे जातो ते एक अद्भुत आहे. त्याला सुरूवातीच्या षटकांमध्ये खेळफट्टीची मदत मिळते आणि त्याचा तो योग्य फायदा उचलत विकेट्स काढतो.
अर्शदीपने या स्पर्धेत आतापर्यंत 5 सामने खेळताना 10 विकेट्स घेतल्या आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेण्याची कामगिरी वानिंदू हसरंगा याने केली आहे. त्याने 8 सामन्यात 15 विकेट्स घेतल्या. The team expects more from Arshdeep Singh than Virat Kohli & Suryakumar Yadav, victory is guaranteed if he shines
अर्शदीपने भारताकडून आतापर्यंत 18 सामने खेळताना 29 विकेट्स घेतल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध त्याने एकच सामने खेळला असून दोन विकेटस घेतल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हैदराबाद एफसीचा सलग पाचवा विजय, जमशेदपूर एफसीला प्रथमच केले पराभूत
न्यूझीलंडला पराभूत केल्यानंतर पाकिस्तानी कोचला चढलाय भलताच आत्मविश्वास; म्हणाला, ‘आम्हाला भिडणारा…’