इंग्लंडचा भारत दौरा अंतिम चरणात आला आहे. आज (२८ मार्च) या दौऱ्यातील आणि वनडे मालिकेतील अखेरचा सामना गहुंजे स्टेडियम, पुणे येथे रंगणार आहे. हा सामना अतिशय रोमांचक ठरणार आहे. हा सामना जिंकत उभय संघांना वनडे मालिका खिशात घालण्याची संधी असणार आहे. याबरोबर यजमान भारतीय संघ वनडे मालिका जिंकत मालिका विजयाची हॅट्रिक नोंदवू शकतो. अशात या चुरशीच्या सामन्यात भारतीय संघाची सलामी जोडी कशी असेल? हा प्रश्न सर्वांना सतावत आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या वनडे सामन्यात रोहित शर्मा आणि शिखर धवन सलामीला आले होते. पहिल्या सामन्यात त्यांनी संघाला चांगली सुरुवात करुन दिली होती. मात्र दुसऱ्या सामन्यात त्यांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नव्हती. असे असले तरीही, दोन्ही सलामीवीरांचा अनुभव पाहता तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यातही रोहित-धवनला सलामीला पाठवले जाऊ शकते.
जर रोहित आणि धवनने पावरप्लेमध्ये विकेट न गमावता मोठी आकडी भागिदारी रचली; तर मधल्या फळीतील फलंदाजांचे काम सोपे होईल. परिणामत: संघाला भक्कम धावसंख्या उभारण्यात यश येईल.
रोहित-धवनव्यतिरिक्त युवा फलंदाज शुबमन गिल याची तिसरा सलामीवीर म्हणून संघात निवड करण्यात आली होती. मात्र अद्याप त्याला वनडे मालिकेत खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे त्याला भारताच्या अंतिम ११ जणांच्या पथकात स्थान मिळण्यासाठी अजून प्रतिक्षा करावी लागू शकते. गिलने आतापर्यंत भारताकडून ३ वनडे सामने खेळले आहेत. दरम्यान त्याने केवळ ४९ धावा केल्या आहेत.
अशी असू शकते भारताची प्लेइंग इलेव्हन-
रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली (कर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षख), रिषभ पंत, हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, शार्दुल ठाकुर, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, प्रसिद्द कृष्णा
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीसीआयचा ‘सॉफ्ट सिग्नल’ आयपीएलमधून हटवला; ‘या’ नियमांमध्येही झाले बदल
सचिन कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर पीटरसनने मारला टोमणा, युवराजने दिले ‘असे’ उत्तर