भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसरा सामना जिंकत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली आहे. मालिकेतील उर्वरित ३ सामने हे नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद येथे होणार आहेत. मालिकेत विजय मिळविण्यासाठी दोनही संघांना कमीत कमी २ सामने जिंकावे लागणार आहेत. या मालिकेकडे विश्वचषकाची तयारी म्हणून पाहिले जात आहे. अशातच इंग्लंडच्या एका दिग्गज खेळाडूला मंगळवारी होणाऱ्या सामन्यात एक मोठा विक्रम करण्याची संधी आहे.
इंग्लंड संघाचा कर्णधार ऑयन मॉर्गनला तिसऱ्या टी२० सामन्यात एक खास कारनामा करण्याची संधी चालून आली आहे. जेव्हा तो तिसऱ्या सामन्यात नाणेफेकीसाठी पाऊल ठेवले तेव्हा हा त्याच्या टी२० कारकिर्दीमधील १००वा सामना ठरणार आहे. २००९ साली पहिल्यांदा टी२० सामना खेळलेल्या ऑयन मॉर्गनने गेल्या ११ वर्षांत ९९ टी२० सामने खेळले आहेत. यात त्याने ३०.३४च्या सरासरीने २३०६ धावा केल्या आहेत.
मंगळवारी जेव्हा तो मैदानात उतरेल तेव्हा त्याचा हा कारकिर्दीतील १००वा सामना ठरणार आहे. यापुर्वी इंग्लंडकडून कोणताही खेळाडू १०० टी२० सामने खेळला नाही. जॉश बटलर हा इंग्लंडकडून ७६ टी२० सामने खेळला असून या यादीत तो दुसऱ्या स्थानी आहे.
बाकी देशांचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीत एकूण केवळ ३ खेळाडू १०० किंवा अधिक टी२० सामने खेळले आहेत. त्यात पाकिस्तानचा शोएब मलिक ११६, भारताचा रोहित शर्मा १०८ व न्यूझीलंडचा रॉस टेलर १०३ सामने खेळला आहे. रॉस टेलरने तर कसोटी, वनडे व टी२०मध्ये प्रत्येकी शंभरपेक्षा जास्त सामने खेळले आहेत. अशी कामगिरी करणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे. पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी व मोहम्मद हफिझ, तसेच न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल हे प्रत्येकी ९९ सामने टी२० प्रकारात खेळले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय संघाकडून पदार्पणासाठी उत्सुक आहे सेहवागचा भाचा, अशी राहिली आहे देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी
इशानने टी२० विश्वचषकात करावी सलामीला फलंदाजी, ‘ही’ आहेत यामागची कारणे
इंग्लंडविरुद्ध वनडे मालिकेसाठी ‘या’ दोन खेळाडूंना मिळणार भारतीय संघात जागा?






