---Advertisement---

IND V NZ 2nd Test Live: मयंकने शतकी खेळीने गाजवला पहिला दिवस; भारताच्या दिवसाखेर ७० षटकात ४ बाद २२१ धावा

---Advertisement---

मुंबई। भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा आणि अखेरचा कसोटी सामना शुक्रवारपासून (३ डिसेंबर) सुरू होत आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होत असलेल्या या सामन्यात मयंक अगरवालने शतकी खेळी केली आहे.

पहिल्या सत्रात मधल्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर दुसऱ्या सत्राची सुरुवात मयंक अगरवाल आणि श्रेयस अय्यरने अश्वासक सुरुवात केली होती. त्यामुळे ही जोडी न्यूझीलंडसाठी डोकेदुखी ठरु शकते असं वाटत असतानाच एजाज पटेलने पुन्हा एकदा आपली कमाल दाखवत श्रेयस अय्यरला १८ धावांवर माघारी धाडले. श्रेयस आणि मयंक यांनी ५ व्या विकेटसाठी ८० धावांची भागीदारी केली.

श्रेयस बाद झाल्यानंतर मयंकला साथ देण्यासाठी यष्टीरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा मैदानात उतरला. त्यानेही मयंकला चांगली साथ देण्यास सुरुवात केली. दरम्यान सलामीला खेळायला आलेल्या मयंकने एक बाजू भक्कमपणे सांभाळताना ५९ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार ठोकत शतक पूर्ण केले. त्याने १९६ चेंडूत त्याचे चौथे शतक पूर्ण केले.

या दोघांनी पहिल्या दिवसाचा खेळ पूर्ण होईपर्यंत न्यूझीलंडच्या गोलंदाजांना मोठे यश मिळू दिले नाही. त्यामुळे भारताने पहिल्या डावात दिवसाखेर ७० षटकात ४ बाद २२१ धावा केल्या. मयंक १२० धावांवर आणि साहा २५ धावांवर नाबाद आहेत.

एजाज पटेलने भारताला दिले मोठे धक्के

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारतीय क्रिकेट संघाकडून शुबमन गिल आणि मयंक अगरवाल यांनी डावाची सुरुवात केली. सुरुवातीपासूनच या दोघांनीही चांगला खेळ करताना न्यूझीलंडच्या गोलंदाजादांवर वर्चस्व गाजवायला सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या २० षटकांच्या आत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केले होती. त्यामुळे या दोघांची जोडी मैदानात स्थिरावली असे वाटत असतानाच २८ व्या षटकात एजाज पटेलने शुबमन गिलला बाद करत भारताला पहिला धक्का दिला. शुबमन गिलने ७१ चेंडूत ४४ धावा केल्या. या खेळीत त्याने ७ चौकार आणि १ षटकार मारले.

त्याच्यानंतर चेतेश्वर पुजारा फलंदाजीला आला होता. मात्र, तो फार काही करु शकला नाही. त्याला एजाज पटेलनेच ३० व्या षटकात त्रिफळाचीत केले. पुजाराला भोपळाही फोडता आला नाही. इतकेच नाही, तर चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेला भारताचा कर्णधार विराट कोहलीही याच षटकात अखेरच्या चेंडूवर पायचीत झाला. तो देखील शून्यावर बाद झाला.

यानंतर श्रेयस अय्यर ५ व्या क्रमांकावर खेळायला आला असून त्याने मयंकला चांगली साथ दिली आहे. दरम्यान, मयंकने अर्धशतक पूर्ण केले. त्याने ११९ चेंडूत त्याचे पाचवे कसोटी अर्धशतक पूर्ण केले.

भारताने ३७ षटकात ३ बाद १११ धावा. मयंक अगरवाल ५२ धावांवर नाबाद आहे. तसेत श्रेयस अय्यर ७ धावांवप नाबाद आहे.

असे आहेत दोन्ही संघ 

या सामन्यासाठी भारताने दुखापतग्रस्त अजिंक्य रहाणेऐवजी विराट कोहली, इशांत शर्माऐवजी मोहम्मद सिराज आणि रविंद्र जडेजाऐवजी जयंत यादव यांना अंतिम ११ जणांच्या संघात संधी दिली आहे. तसेच न्यूझीलंडने केन विलियम्सनऐवजी डॅरिल मिशेलला अंतिम ११ जणांच्या संघात संधी दिली आहे.

असे आहेत ११ जणांचे संघ  –

न्यूझीलंड: टॉम लॅथम (कर्णधार), विल यंग, ​​डॅरिल मिशेल, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), रचिन रवींद्र, काइल जेमिसन, टिम साउथी, विल्यम सोमरविले, एजाज पटेल

भारत: मयंक अगरवाल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज.

सामन्याला उशीरा सुरुवात

या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वीच पावसामुळे व्यत्यय आला होता. गेल्या २ दिवसांपासून महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी कोसळत आहेत, मुंबईलाही पावसाने झोडपले आहे. त्याचमुळे सध्या वानखेडे मैदान ओले असल्याने सामन्याला उशीरा सुरुवात झाली.

सकाळी ११.३० वाजता नाणेफेक 

बीसीसीआयने दिलेल्या नव्या अपडेट नुसार पंच आणि सामनाधिकाऱ्यांनी सकाळी ११.३० वाजता नाणेफेक होऊ शकते असे सांगितले आहे. तसेच दुपाकी १२ वाजता सामन्याला सुरुवात होईल. तसेच दिवसभरात ७८ षटकांचा खेळ होणार आहे. त्यामुळे पहिले सत्र खेळवण्यात येणार नाही, त्यामुळे लंचब्रेक लवकर घेण्यात आला असून दुपारी १२ ते २.४० पर्यंत दुसरे सत्र खेळवण्यात येईल. तर दिवसातील अखेरचे सत्र ३ ते ५.३० दरम्यान होईल.

सकाळी १०.३० वाजता पुन्हा तपासणी

नव्या अपडेटनुसार पहिल्या तपासणीनंतर सामना सुरू करण्यास मैदानात तितके सुकलेले नसल्याने आता पुन्हा १०.३० वाजता पंच आणि सामनाधिकारी मैदानाची तपासणी करणार आहे.

चार खेळाडू सामन्यातून बाहेर

भारताचे अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा, उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि वेगवान गोलंदाज इशांत शर्माला, तसेच न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनला दुखापतींमुळे सामन्यातून बाहेर व्हावे लागले आहे. जडेजाच्या उजव्या हाताला सुज आहे, तर इशांतच्या करंगळीला दुखापत झाली आहे. याशिवाय रहाणेला हॅमस्ट्रिंगचा त्रास होत आहे आणि विलियम्सन कोपराच्या दुखापतीने त्रस्त आहे.

सकाळी ९.३० वाजता पहिली तपासणी

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार सकाळी ९.३० वाजता मैदान तपासले जाणार आहे. त्यानंतरच पंचांच्या सल्ल्यानुसार सामन्याला सुरुवात होईल. खरंतर सकाळी ९ वाजता नाणेफेक होणार होती, पण आता मैदान ओले असल्याने नाणेफेकही उशीरा होईल.

हवामानाच्या अंदाजानुसार पहिल्या दिवशी पावसाचा व्यत्यय राहणार आहे, मात्र उर्वरित ४ दिवशी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला नाही.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---