भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) यांच्यात मालिकेतील दुसरा वनडे सामना रविवारी (9 ऑक्टोबर) खेळला जाणार आहे. जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्स, रांची येथे खेळल्या जाणाऱ्या या वनडे सामन्यात भारताला मालिकेत आपले आव्हान टीकवून ठेवायचे असेल तर विजय मिळवणे आवश्यक आहे. तसेच या मालिकेतील पहिला सामना जिंकत दक्षिण आफ्रिका तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 असा आघाडीवर आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या नेतृत्वाची जबाबदारी केशव महाराज सांभाळणार आहे. महाराजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यातून दक्षिण आफ्रिकेच्या तबरेझ शम्सी आणि टेंबा बवुमा यांना वगळले आहे. त्यांच्या जागी रीझा हेंड्रिक्स आणि ब्योर्न फॉर्च्युइन यांची अंतिम अकरामध्ये निवड झाली आहे. भारतीय संघातही दोन बदल झाले आहेत. रुतूराज गायकवाड आणि रवी बिश्नोई यांना विश्रांती दिली आहे, तर वॉशिंग्टन सुंदर याचे संघात पुनरागमन झाले आहे. तसेच शाहबाज अहमद (Shahbaz Ahmed) याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण झाले आहे. तो भारताचा 247वा वनडे खेळाडू ठरला आहे.
दुसऱ्या वनडेसाठी दोन्ही संघाची प्लेईंग इलेवन-
भारतीय संघ – शिखर धवन (कर्णधार), शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर, श्रेयस अय्यर, इशान किशन, संजू सॅमसन (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज, आवेश खान.
🚨 Team News 🚨
2⃣ changes for #TeamIndia as Shahbaz Ahmed, on debut, & @Sundarwashi5 are named in the team. #INDvSA
Follow the match ▶️ https://t.co/6pFItKiAHZ
A look at our Playing XI 🔽 pic.twitter.com/gmc4Yg3KfI
— BCCI (@BCCI) October 9, 2022
दक्षिण आफ्रिका- केशव महाराज (कर्णधार), जानेमन मलान, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, वेन पार्नेल, ब्योर्न फॉर्च्युइन, कगिसो रबाडा, एनरीच नोर्तजे.
TEAM ANNOUNCEMENT 🚨
➡️ Hendricks, Fortuin and Nortje are brought in
⬅️ Bavuma, Shamsi (both illness) and Ngidi (rested) misses out🇿🇦 Captain Maharaj has won the toss and will bat first
🗒️Ball by ball https://t.co/KNz7vLGAZd
📺SuperSport Grandstand 201#INDvSA #BePartOfIt pic.twitter.com/uNtN1rYFqK— Proteas Men (@ProteasMenCSA) October 9, 2022
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
न्यूझीलंडच टेन्शन वाढलं! दोन दिवसात दुसरा मॅचविनर दुखापतग्रस्त
अदानींची क्रिकेटजगतात एन्ट्री! या शहरात बांधणार तब्बल 60,000 कोटींचे स्टेडियम