कोणत्याही खेळात मैदानावर प्रेक्षक असतील तरच खेळाडूंना खेळण्यासाठी हुरूप येत असतो. प्रेक्षकांना खेळाचा अविभाज्य अंग मानले जाते. मात्र, काहीवेळा मैदानात असे काही विचित्र प्रेक्षक हजेरी लावतात की, सर्वांच्या नजरा त्यांच्यावर अडकून पडतात. कोणी विशिष्ट प्रकारची हेअरस्टाईल करून मैदानात येते, तर कोणी खेळाडूंसारखी वेशभूषा केल्याचे आपण पाहतो. भारताचे माजी खेळाडू सचिन तेंडूलकर व एमएस धोनी यांचे चाहते तर संपूर्ण अंगावर रंगरंगोटी करून येत. परंतु हे चाहते मैदानावरील व टेलिव्हिजनवरील प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी होतात. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यादरम्यान झालेल्या तिसऱ्या वनडेमध्ये देखील अशाच एका चाहत्याने अजब पोस्टरसह मैदानात हजेरी लावली.
तिसऱ्या सामन्यात दिसला निराळा प्रेक्षक
कॅनबेरामध्ये खेळला गेलेला मालिकेतील तिसरा वनडे सामना भारताने जिंकत, प्रतिष्ठा राखली. सामना अटीतटीचा होत असतानाच, ऑस्ट्रेलियाच्या डावातील २७ व्या षटकानंतर कॅमेरामनने कॅमेरा प्रेक्षकांमध्ये फिरवला. त्यावेळी एक भारतीय प्रेक्षक अत्यंत नाविन्यपूर्ण पोस्टरसह टेलिव्हिजनवर झळकला. या प्रेक्षकाने टेलिव्हिजनच्या आकारातील पोस्टरमध्ये आपला चेहरा ठेवला होता. सोबतच, त्या पोस्टरवर लिहिले होते, ‘आई बघ. मी टेलिव्हिजनवर दिसतोय.’
त्या प्रेक्षकाची ही शक्कल सर्वांना आवडली. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्याचा हा फोटो वेगाने व्हायरल झाला.
दुसऱ्या सामन्यात भारतीय प्रेक्षकाने केले होते ऑस्ट्रेलियन तरुणीला प्रपोज
सिडनी येथे झालेल्या मालिकेतील दुसऱ्या वनडे सामन्यात एका भारतीय तरूणाने ऑस्ट्रेलियन तरुणीला प्रपोज केले होते. त्या तरुणीने त्या तरुणाचे प्रपोज स्वीकारत त्याला मिठी मारलेली. गेली दोन दिवस या ‘जगावेगळ्या’ प्रपोजची सोशल मीडियावर चर्चा आहे. अनेकांनी त्यावर मीम बनवले आहेत.
https://twitter.com/tejas_pujare/status/1333070108470648833
Sweet moment ! But why would anyone want to propose in the middle of stadium amidst LIVE match for such a personal heart felt matter!!! mean if answer expected can go either way! This is done just to grab some limelight when proposal and response are perhaps pre-known!@Gmaxi_32 pic.twitter.com/OyRcWYqybL
— Sumit arya (@codewithsumit_0) November 30, 2020
मैदानावर पाहायला मिळतात अजबगजब प्रेक्षक
यापूर्वी देखील क्रिकेटच्या मैदानावर काही अजब गजब प्रेक्षक पाहायला मिळाले आहेत. ऑस्ट्रेलियाचे महान खेळाडू व समालोचक रिची बेनो यांच्यासारखी वेशभूषा करून एक अख्खा समूह मैदानात येत असत. श्रीलंकेचा जगप्रसिद्ध वेगवान गोलंदाज लसित मलिंगा याच्या केसांसारखे विग घातलेले प्रेक्षक हमखास पाहायला मिळतात. भारताचे माजी खेळाडू सचिन तेंडुलकर व वीरेंद्र सेहवाग यांच्यासारखे हुबेहूब दिसणारे काही प्रेक्षक देखील मैदानावर हजेरी लावत.
महत्त्वाच्या बातम्या-
फलंदाजीत कमावलं ते गोलंदाजीत गमावलं! जड्डू आता ‘त्या’ नकोशा विक्रमाच्या यादीत दुसर्या स्थानी
ट्रेंडिंग लेख-
विराटच्या अनुपस्थित टीम इंडियाच्या चिंतेत वाढ; उद्भवू शकतात ‘या’ तीन समस्या
लाजवाब! ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी२० मालिकेत खोर्याने धावा काढणारे ३ भारतीय खेळाडू





