भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात २७ नोव्हेंबरपासून वनडे मालिका सुरू होत आहे. सध्या दोन्हीही संघांचे खेळाडू जैव- सुरक्षित वातावरणात सराव करत आहेत. अशामध्येच आता ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नरने त्याचे बिग बॅश लीगमध्ये खेळणे शक्य नसल्याचे सांगितले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाची टी२० लीग बीबीएललाही सुरुवात होत आहे. माध्यमांशी बोलताना वॉर्नरने म्हटले की, “एक खेळाडू म्हणून तुम्हाला तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळणे शक्य नाही. जरी थोडा कालावधी मिळाला, तर तुम्हाला विश्रांती घ्यावी लागते. कारण तुमच्यासमोर पूर्ण उन्हाळा आहे. तिथे तुम्हाला कोणताही ऑफ सिझन मिळणार नाही.”
“वैयक्तिकरीत्या सांगायचं झालं, तर मला पत्नी आणि ३ अपत्ये आहेत. त्यांच्यासोबतही मला वेळ घालवण्याची आवश्यकता असते. अशामध्ये तीन क्रिकेट प्रकारात खेळणे माझ्यासाठी कठीण होऊन जाते. खरं सांगायचं झालं, तर राष्ट्रीय संघाकडून खेळताना माझे बिग बॅश लीगमध्ये खेळणे शक्य नाही,” असे आपली समस्या मांडत वॉर्नर म्हणाला.
याव्यतिरिक्त वॉर्नर आयपीएलमध्येही खेळतो. तो सनरायझर्स हैदराबाद या संघाचा कर्णधार आहे. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल २०२० मध्ये त्याने १६ सामने खेळले. यात त्याने ३९.१४ च्या सरासरीने ५४८ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ४ अर्धशतकेही ठोकली आहेत. या हंगामात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये झिरो ठरलेला ‘तो’ भारताविरुद्ध ‘हिरो’ ठरण्यासाठी घेतोय कसून मेहनत
परदेशी लीग खेळण्याची परवानगी मिळाल्यास ‘हे’ ३ भारतीय होऊ शकतात बीबीएलचे कर्णधार
जबरदस्त फिरकीपटू लामिछाने खेळणार मिलरसोबत; बिग बॅशमधील ‘या’ संघाशी झाला करार