अमनजोत कौर हिने रविवारी (16 जुलै) भारतीय महिला संघासाठी वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केले. पदार्पणाचा हा सामना तिच्यासाठी आणि भारतीय संघासाठी खास ठरला. बांगालदेशविरुद्दच्या वनडे मालिकेतील हा पहिला सामना असून यजमना संघाला भारताने अवघ्या 152 धावांवर सर्वबाद केले. अमनजोत कौर हिने यादरम्यान 9 षटके गोलंदाजी करत 31 धावा खर्च केल्या आणि चार विकेट्स घेतल्या.
भारतीय संघाची कर्णधार हमनप्रीत कौर (Harmanpreet Kaur) हिने वनडे मालिकेतील या पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. खेळपट्टी टी-20 मालिकेप्रमाणेच फलंदाजांसाठी अनुकूल दिसली नाही. भारतीय गोलंदाजांनी पहिल्या डावात या खेळपट्टीचा पुरेपूर फायदा उचलल्याचे दिसले. बांगलादेश संघ मायदेशातील सामन्यात 50 षटकेही खेळून काढू शकला नाही. 43 षटकांमध्ये 152 धावा करून बांगलादेशने सर्व विकेट्स गमावल्या. यादरम्यान त्यांचा रन रेट अवघा 3.53 धावांचा होता. मधल्या फळीतील कर्धणार निगार सुलताना हिने सर्वाधिक 39 धावांची खेळी बांगलादेशसाठी केली. पदार्पण करणाऱ्या अमनजोत कौर (Amanjot Kaur) हिने मुर्शिदा खातून, फरगाना हक, निगार सुलताना आणि राबिया खान यांच्या विकेट्स घेतल्या.
A fabulous bowling display by #TeamIndia, led by debutant Amanjot Kaur's four-wicket haul as Bangladesh are all-out for 152.
India's chase now underway.
Scorecard – https://t.co/x0e3tBYFKd…… #BANvIND pic.twitter.com/p6ITSLUvjB
— BCCI Women (@BCCIWomen) July 16, 2023
दरम्यान, उभय संघांतील हा पहिला वनडे सामना मिरपूरच्या शेर ए बांगला स्टेडियमवर खेलला जात आहे. वनडे मालिकेआधी याच ठिकाणी भारत आणि बांगादेश सांघातील तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाणार आहे. टी-20 मालिकेतील तिन्ही सामने हे कमी धावसंख्येचे झाले असून खेळपट्टीबाबत प्रश्न उपस्थित केले गेले. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर हिनेही खेळपट्टीबाबवत नाराजी व्यक्त करत वनडे मालिकेत चांगली खेळपट्टी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. (INDvsBAG Womens । Amanjot Kaur registers a 4 wicket haul on ODI debut )
महत्वाच्या बातम्या –
IPL Auctionमध्ये खरेदी न केल्याने RCBवर संतापलेला चहल, बोलणंही केलं होतं बंद; स्वत:च केला खुलासा
दुर्लक्षित केल्या जाणाऱ्या सरफराजसाठी दिग्गज पाँटिंगही हळहळला; म्हणाला, ‘मला त्याच्यासाठी…’