भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामना आजपासून (०४ मार्च) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू झाला आहे. या सामन्यात पहिल्या दिवसाखेर भारताने पहिल्या डावात १२ षटकात १ बाद २४ धावा केल्या आहे. पहिल्या दिवसाखेर रोहित शर्मा ८ धावांवर आणि चेतेश्वर पुजारा १५ धावांवर नाबाद आहे.
या सामन्यात इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांवर संपला. त्यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाला पहिला धक्का लवकर बसला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने डावाच्या पहिल्याच षटकात सलामीवीर शुबमन गिलला शुन्य धावेवर पायचीत केले. त्यामुळे सलामीवीर रोहित शर्माला साथ देण्यासाठी चेतेश्वर पुजाराला पहिल्याच षटकात मैदानात यावे लागले.
मात्र यानंतर रोहित आणि चेतेश्वरने भारताचा डाव सांभाळत दिवसाखेरपर्यंत आणखी पडझड होऊ दिली नाही. त्यामुळे आता हे दोघे दुसऱ्या दिवशी भारताकडून फलंदाजी सुरु करतील.
इंग्लंडचा पहिला डाव २०५ धावांवर संपुष्टात
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडला पहिल्या डावात ७५.५ षटकात सर्वबाद २०५ धावाच करता आल्या आहेत. इंग्लंडकडून या डावात बेन स्टोक्सने सर्वाधिक ५५ धावा केल्या. तसेच डॅनियल लॉरेन्सने ४६ धावांची खेळी केली. अन्य कोणत्याही फलंदाजाला ३० धावांचा टप्पा पार करता आला नाही. भारताकडून अक्षर पटेलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर आर अश्विनने ३ विकेट्स, मोहम्मद सिराजने २ आणि वॉशिंग्टन सुंदरने १ विकेट घेतली.
अक्षरने एकाच षटकात दिले २ धक्के
इंग्लंडने ६ व्या विकेट्सच्या रुपात ओली पोपची विकेट गमावल्यानंतर अन्य विकेट्सही झटपट गमावल्या. तळातल्या फलंदाजांना फार संघर्ष करता आला नाही. अक्षर पटेलने ७१ व्या षटकात चांगली फलंदाजी करत असलेल्या डॅनियल लॉरेन्सला बाद केले. त्याचा झेल रिषभ पंतने घेतला. लॉरेन्सने ७४ चेंडूत ४६ धावांची खेळी केली. त्याच षटकात डॉमनिक बेस ३ धावा करुन पायचीत झाला. त्यापुढे आर अश्विनने जॅक लीचला ७६ व्या षटकात ७ धावांवर पायचीत करत इंग्लंडचा डाव २०५ धावांवर संपवला. जेम्स अँडरसन १० धावांवर नाबाद राहिला.
तिसऱ्या सत्रात अश्विनने दिले २ धक्के
तिसऱ्या सत्राच्या आधीच ५ विकेट्स गमावल्यानंतर ओली पोप आणि डॅनियम लॉरेन्स यांनी इंग्लंडचा डाव सावरला होता. त्यांनी ६ व्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी रचली. पण अखेर आर अश्विनने ओली पोपला ६२ व्या षटकात शुबमन गिलकडे झेल देण्यास भाग पाडले. पोपने ८७ चेंडूत २९ धावा केल्या. यानंतर अश्विनने ६६ व्या षटकात यष्टीरक्षक फलंदाज बेन फोक्सला बाद केले आणि इंग्लंडला डावातील एकूण ७ वा धक्का दिला. फोक्स केवळ १ धाव करुन बाद झाला.
इंग्लंडने पहिल्या डावात ६८ षटकात ७ बाद १८७ धावा केल्या आहेत. इंग्लंडकडून डॉमनिक बेस ७ चेंडूत ३ धावांवर खेळत आहे. तर डॅनियल लॉरेन्स ६८ चेंडूत ३६ धावांवर खेळत आहे.
2⃣ wickets in quick succession for @ashwinravi99! 👍👍
A fine low catch by @ajinkyarahane88 in the slips. 👌👌
England 7⃣ down as Ben Foakes gets out. @Paytm #INDvENG #TeamIndia
Follow the match 👉 https://t.co/9KnAXjaKfb pic.twitter.com/FqXuJPb9mR
— BCCI (@BCCI) March 4, 2021
स्टोक्सचे अर्धशतक
दुसऱ्या सत्राखेर इंग्लंड संघ ५६ षटकांनंतर ५ बाद १११ धावांवर आहे. ओली पोप आणि डॅनियल लॉरेन्स फलंदाज करत आहेत.
दिवसाच्या पहिल्या सत्रातच अक्षर पटेलने इंग्लंडची सलामी जोडी बाद केली होती. त्यानंतर दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच मोहम्मदीने जो रुटची अतिशय महत्त्वपुर्ण विकेट काढली. पुढे जॉनी बेयरस्टोही २८ धावांवर सिराजच्या चेंडूवर पायचित झाला.
अशात बेन स्टोक्स विकेट वाचवून ओली पोपसोबत मिळून डावास चालना देत होता. त्याने कसेबसे अर्धशतकही पूर्ण केले. तेवढ्यात अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरने ५५ धावांवर त्याला पायचित केले.
That's Tea on Day 1 of the 4⃣th @Paytm #INDvENG Test!
We shall be back for the third & final session of the Day shortly.
Scorecard 👉 https://t.co/9KnAXjaKfb pic.twitter.com/5hjAeKfkxF
— BCCI (@BCCI) March 4, 2021
मोहम्मद सिराजच्या हाती दुसरे यश
युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचे जो रूटनंतर जॉनी बेयरस्टोची महत्त्वाची विकेट काढली. आघाडीचे ३ फलंदाज माघारी परतल्यानंतर बेयरस्टो बेन स्टोक्ससोबत मिळून संघाचा डाव पुढे नेत होता. दोघेही बचावात्मक फलंदाजी करताना मैदानावर स्थिरावले होते. अशात सिराजने डावातील २९ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर बेयरस्टोला पायचित केले. त्यामुळे ६७ चेंडूत २८ धावांवर बेयरस्टो बाद झाला.
त्याच्यानंतर ओली पोप फलंदाजीसाठी मैदानावर आला आहे. इंग्लंड संघ २९ षटकांनंतर ४ बाद ७८ धावांवर आहे.
England 4⃣ down!
Mohammed Siraj picks his 2⃣nd wicket. 👍👍
Jonny Bairstow is out LBW. @Paytm #INDvENG #TeamIndia
Follow the match 👉 https://t.co/9KnAXjaKfb pic.twitter.com/reUWwrKke5
— BCCI (@BCCI) March 4, 2021
जो रूट स्वस्तात बाद
युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच चेंडूवर इंग्लंडचा कर्णधार जो रुटच्या रुपात संघाला मोठी विकेट मिळवून दिली.
सलामीवीर डोम सिब्ली (२ धावा) आणि जॅक क्राउले (९ धावा) बाद झाल्यानंतर जॉनी बेयरस्टो आणि जो रूट मिळून संघाचा डाव पुढे नेत होते. अशात सिराजने डावातील १३ वे षटक टाकताना पहिल्याच चेंडूवर रूटला पायचित केले. त्यामुळे अवघ्या ९ चेंडूत ५ धावा करत रूट पव्हेलियनला परतला. रूटची विकेट पडल्यानंतर इंग्लंड संघ ३ बाद ३० धावांवर आहे.
#TeamIndia turning the heat up 🔥
3️⃣ wickets down 🏴 #INDvENG @Paytm
Follow the match 👉 https://t.co/9KnAXjaKfb pic.twitter.com/XVscu0ifuE
— BCCI (@BCCI) March 4, 2021
अक्षर पटेलकडून इंग्लंडला पहिला धक्का
भारतीय फिरकीपटूंनी पहिल्या ६ षटकातच इंग्लंडला पहिला धक्का दिला आहे. फिरकी गोलंदाज अक्षर पटेलने डावातील आपल्या पहिल्याच षटकात इंग्लंडला सलामीवीर डोम सिब्लीला त्रिफळाचीत केले आहे. त्यामुळे ८ चेंडूत अवघ्या २ धावांवर सिब्ली पव्हेलियनला परतला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर जॉनी बेयरस्टो फलंदाजीसाठी उतरला आहे. पहिली विकेट पडल्यानंतर इंग्लंड संघ १ बाद १० धावांवर आहे.
नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूने
सामन्याची सुरुवात होण्यापुर्वी दोन्ही संघांमध्ये नाणेफेक झाली असून इंग्लंडच्या बाजूने नाणेफेकीचा निकाल लागला आहे. कर्णधार जो रूटने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन घोषित झाली असून दोन्ही संघात काही बदल करण्यात आला आहे.
वैयक्तिक कारणामुळे या सामन्यातून माघार घेतलेल्या भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या जागी युवा गोलंदाज मोहम्मद सिराजला संधी देण्यात आली आहे. उर्वरित भारतीय संघ तिसऱ्या कसोटी सामन्याप्रमाणे आहे. दुसरीकडे इंग्लंड संघात वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला बाहेर करत डोम बेसला स्थान देण्यात आले आहे. तसेच जोफ्रा आर्चरच्या जागी डॅन लॉरेन्सला अंतिम ११ जणांच्या खेळाडूंमध्ये जागा मिळाली आहे
Toss Update:
England have won the toss & elected to bat against #TeamIndia in the 4⃣th @Paytm #INDvENG Test in Ahmedabad.
Follow the match 👉 https://t.co/9KnAXjaKfb pic.twitter.com/lgKchd6v3i
— BCCI (@BCCI) March 4, 2021
असा आहे भारतीय संघ-
रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, आर अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद सिराज
असा आहे इंग्लंडचा संघ –
डोमिनिक सिब्ली, झॅक क्रॉली, जॉनी बेअरस्टो, जो रूट (कर्णधार), बेन स्टोक्स, ओली पोप, बेन फोक्स, डॅनियल लॉरेन्स, डोमिनिक बेस, जॅक लीच, जेम्स अँडरसन
महत्त्वाच्या बातम्या-
कुलदीप यादवला दुर्लक्षित का केलं जात? कॅप्टन कोहलीने दिले उत्तर
अग्गबाई, वर एक आणि वधू दोन!! बुमराहची खरी वधूराणी कोण? साउथ अभिनेत्रीसह ‘ही’ स्पोर्ट अँकरही चर्चेत
Covid-19 Vaccine: विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी टोचून घेतली कोरोनाची लस