---Advertisement---

कुलदीप यादवला दुर्लक्षित का केलं जात? कॅप्टन कोहलीने दिले उत्तर

On: गुरूवार, मार्च 4, 2021 8:54 AM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा सामना आजपासून (०४ मार्च) नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार असून हा सामना भारतीय संघाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघाकडे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची संधी असणार आहे. हा सामना अनिर्णित राहिला तरीसुद्धा भारतीय संघ कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करेल. या मालिकेत भारतीय संघ २-१ ने पुढे आहे. अशातच गेल्या काही महिन्यांपासून संघातून आत-बाहेर होत असलेल्या कुलदीप यादव बद्दल कर्णधार विराट कोहलीने मोठे वक्तव्य केले आहे.

भारतीय संघातील डाव्या हाताचा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव याला २०१९ पासून, संघात खेळण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे. इंग्लंड विरूद्ध होत असलेल्या मालिकेत त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यात संघात समाविष्ट केले गेले. पण त्याला जास्त गोलंदाजी करण्याची संधीच मिळाली नाही. अशातच कर्णधार कोहलीने कुलदीपला संघात स्थान न मिळण्याचे कारण स्पष्ट केले आहे. विराटने म्हटले की, कुलदीपच्या गोलंदाजीमध्ये कमतरता नाहीये. पण टीम कॉम्बिनेशनचा देखील विचार करावा लागतो.

कुलदीपची गोलंदाजी एकदम ठीक

जेव्हा कोहलीला विचारण्यात आले की, कुलदीप आता संघाच्या रणनीतीचा भाग नाहीये का? यावर कोहली म्हणाला, “असे नाही, कुलदीपने एका वेळेपर्यंत युजवेंद चहलसोबत मिळून संघासाठी महत्वाची भुमिका बजावली आहे. परंतु तो आता टीम कॉम्बिनेशनमध्ये फिट बसत नाही. त्याचा खेळ अजुनही उत्तम झाला आहे. तो सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत आहे. परंतु आम्हाला टीम कॉम्बिनेशनचाही विचार करावा लागतो. तसेच संघ आधीपेक्षा जास्त संतुलित झाला असल्याचाही विश्वास आमच्यात असावा.”

रवींद्र जडेजाबद्दल विराट कोहली म्हणाला

पुढे तो म्हणाला, “जर रवींद्र जडेजा संघात खेळत असेल तर, तिसरा फिरकी गोलंदाज म्हणून कुलदीप यादवची संघात निवड होऊ शकते. परंतु जडेजा दुखपतीतून बाहेर येत आहे. आता आम्ही अश्विन, वॉशिंग्टन आणि अक्षर यांच्या कॉम्बिनेशनसोबत खेळत आहोत. हे सर्व कॉम्बिनेशनवर निर्भर आहे. जर लोक चांगले नसतील तर ते संघाचा भाग नसतील. ही सामान्य गोष्ट आहे.”

खेळाडूंच्या बचावत विराट म्हणाला

“४ वर्षांपूर्वी परदेशात जाऊन धावा होत नसल्याने सर्वत्र त्यांच्यावर टीका केली जात होती. परंतु आता ते भारतीय संघासाठी उत्तम कामगिरी करत आहेत. काही सामन्यात सर्वच फलंदाजांना या गोष्टींना सामोरे जावे लागते. रोहितने चांगली फलंदाजी केली आहे, अश्विनने तसेच अजिंक्यने दोन अर्धशतक झळकावले आहे,” असे शेवटी कोहलीने सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या-

अग्गबाई, वर एक आणि वधू दोन!! बुमराहची खरी वधूराणी कोण? साउथ अभिनेत्रीसह ‘ही’ स्पोर्ट अँकरही चर्चेत

Covid-19 Vaccine: विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी टोचून घेतली कोरोनाची लस

‘केविन ओब्रायन’ने तेव्हा गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढली होती! वाचा २०११च्या विश्वचषकातील ‘त्या’ ऐतिहासिक खेळीबद्दल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---