---Advertisement---

वैभव सूर्यवंशीची झिम्बाब्वेविरुद्ध विश्वविक्रमी फिफ्टी! आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात ‘ही’ कामगिरी…

On: रविवार, जुलै 26, 2026 6:04 PM
---Advertisement---

भारताचा युवा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशीने झिम्बाब्वे दौऱ्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने रविवारी (26 जुलै) खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी 20 सामन्यात अर्धशतक केले, जे त्याचे या मालिकेतील दुसरे अर्धशतक ठरले. त्याने हे दुसरे अर्धशतक करताच एका खास विश्वविक्रमाची नोंद आपल्या नावे केली आहे. त्याचबरोबर त्याने नेपाळच्या फलंदाजालाही मागे टाकले आहे.

वैभवने झिम्बाब्वेविरुद्ध 31 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. तो या तिसऱ्या सामन्यात संयमाने फलंदाजी करताना दिसला. त्याचे शॉट सिलेक्शनही उत्तम होते. त्याने ही अर्धशतकी खेळी करताच पुरुष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वयाची 16 वर्ष पूर्ण होण्याआधी दोन अर्धशतकी खेळी करणारा पहिला फलंदाज, हा विक्रम आपल्या नावे केला आहे.

विक्रमी अर्धशतक करताना वैभवने नेपाळच्या कुशल मालाला मागे टाकले, ज्याने वयाच्या 16 वर्ष पूर्ण होण्याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदा 50 पेक्षा अधिक धावा करण्याचा पराक्रम केला होता.

पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये वय 16 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी 50+ धावसंख्या करणारे
2 वेळा – वैभव सूर्यवंशी (भारत)
1 वेळा – कुशल माला (नेपाळ)

वैभव झिम्बाब्वेविरुद्धच्या तिसऱ्या टी 20 सामन्यात 49 चेंडूंत 8 चौकार आणि 4 षटकारांच्या सहाय्याने 81 धावा करत बाद झाला. त्याची ही टी 20 आंतरराष्ट्रीय मधील सर्वोत्तम फलंदाजीची कामगिरी ठरली आहे. त्याने या संघाविरुद्ध पहिले अर्धशतक केले असता त्याचे वय 15 वर्ष आणि 118 दिवस होते, तर दुसरे अर्धशतक वयाच्या 15 वर्ष आणि 121 दिवसांनी झळकावले. त्यामुळे टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 50+ धावा करणारा सर्वात युवा खेळाडू म्हणून पहिल्या दोन्ही स्थानांवर आता वैभवचे राज्य आहे.

टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 50+ धावा करणारा सर्वात युवा खेळाडू (पूर्ण सदस्य)
15 वर्ष 118 दिवस – वैभव सूर्यवंशी विरुद्ध झिम्बाब्वे, 2026
15 वर्ष 121 दिवस – वैभव सूर्यवंशी विरुद्ध झिम्बाब्वे, 2026

17 वर्ष 296 दिवस – रहमनुल्ला गुरबाज विरुद्ध झिम्बाब्वे, 2019
17 वर्ष 354 दिवस – रहमनुल्ला गुरबाज विरुद्ध वेस्ट इंडिज, 2019
19 वर्ष 37 दिवस – अहमद शहजाद विरुद्ध न्यूझीलंड, 2010
19 वर्ष 109 दिवस – रहमनुल्ला गुरबाज विरुद्ध झिम्बाब्वे, 2021
19 वर्ष 121 दिवस – लुआन ड्रे प्रिटोरियस विरुद्ध न्यूझीलंड, 2025

भारताने तिसऱ्या टी 20 सामन्यात वैभवच्या अर्धशतकी खेळीमुळे 20 षटकांत 5 विकेट्स गमावत 192 धावसंख्या उभारली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---