भारतीय वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाने मागील दीड महिन्यात बरेच चढ-उतार पाहिले आहे. त्यापैकी एक महत्त्वाची बाब म्हणजे एक, दोन किंवा तीन नाही, तर तब्बल 8 खेळाडूंचे पदार्पण झाले आहे. 6 जून 2026 पासून ते 25 जुलै 2026 म्हणजे या जवळपास 50 दिवसांदरम्यान भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये आठ खेळाडूंनी पदार्पण केले आहे.
या 50 दिवसांदरम्यान भारताने एक कसोटी, वनडे आणि तीन टी 20 मालिकांसह एकूण 13 सामने खेळले. कसोटी संघामध्ये केवळ एका खेळाडूचे पदार्पण झाले. फिरकीपटू मानव सुथारने अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमात्र कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो कारकिर्दीच्या पहिल्याच सामन्यात ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरला. त्याने त्या सामन्यात 7 विकेट्स घेण्याची लक्षवेधी कामगिरी केली होती.
भारताच्या वनडे संघात यावर्षी आतापर्यंत तीन खेळाडूंनी पदार्पण केले आहे. हर्ष दुबे, प्रिन्स यादव आणि गुरनूर ब्रार या तिघांनीही अफगाणिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतून पदार्पण केले. हर्ष आणि गुरनूर यांनी धरमशालेत खेळल्या गेलेल्या वनडे सामन्यातून तर प्रिन्सने लखनऊमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यातून वनडे पदार्पण केले.
भारताने गेल्या 50 दिवसांत तीन टी 20 मालिकेत खेळताना 9 सामने खेळले आहेत. यामधून पाच खेळाडूंनी टी 20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. प्रिन्स आणि सूर्यांश शेडगे यांनी आयर्लंड दौऱ्यात, तर वैभव सूर्यवंशीने इंग्लंड दौऱ्यात पदार्पण केले. उर्वरित दोन खेळाडू, अशोक शर्मा आणि यश ठाकुर यांनी झिम्बाब्वे दौऱ्यातील टी 20 मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे.
भारतीय संघाकडून पदार्पण करणारे खेळाडू (2026)
कसोटी
मानव सुथार विरुद्ध अफगाणिस्तान, मुल्लाणपूर
वनडे
हर्ष दुबे विरुद्ध अफगाणिस्तान, धरमशाला
गुरनूर ब्रार विरुद्ध अफगाणिस्तान, धरमशाला
प्रिन्स यादव विरुद्ध अफगाणिस्तान, लखनऊ
टी 20 आंतरराष्ट्रीय
प्रिन्स यादव विरुद्ध आयर्लंड, बेलफास्ट
सूर्यांश शेडगे विरुद्ध आयर्लंड, बेलफास्ट
वैभव सूर्यवंशी विरुद्ध इंग्लंड, मॅंचेस्टर
अशोक शर्मा विरुद्ध झिम्बाब्वे, हरारे
यश ठाकुर विरुद्ध झिम्बाब्वे, हरारे
(with Vaibhav Sooryavanshi 9 players made their debut for Team India in 50 days; check out the full list.)






